if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
आमचा पैलवान निवडणूक लढविण्यास कधीच तयार , भरत भाई भगत यांची ललकारी !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) बापाला जो हारवू शकत नाही , तो पोराला काय हारवणार , अशी ललकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ” मुलुख मैदानी तोफ ” म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र प्रदेश सचिव भरत भाई भगत यांनी सदर बैठकीत गर्जली असून आमचा पैलवान कधीच निवडणूक लढण्यास तयार असल्याचे मत त्यांनी मांडले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक रविवारी पक्ष कार्यालयात आयोजित केली होती , त्यावेळी ते बोलत होते . त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून भविष्यातील आमदार हे सुधाकर भाऊ घारेच असतील असे चित्र त्यांनी सर्वांसमोर उभे केले.
या मतदार संघात सुधा भाऊंनी सर्वांचे प्रेम कमावले आहे , विकास कार्याचे वारे त्यांच्या नावाने सर्वत्र घोंघावू लागले असून या कार्याच्या जोरावरच ते निवडणुक लढणार आहेत व आमदार तुम्हीच होणार आहात , सर्व कार्यकर्त्यांची फळी तुमच्या पाठीशी उभी आहे , असे आश्वासन देत तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे , तुम्ही एक चांगले नेतृत्व आहे ,यावर भरत भाई भगत यांनी प्रकाश टाकला . कर्जतच्या विकासाबद्दल बोलताना फक्त या मतदार संघातीलच ” डांबर लगेच कशी विरघळते , म्हणजेच येथील ” काम कमी आणि अर्धे तुम्ही – अर्धे आम्ही ” , अशी खोचक टिका त्यांनी केली .
स्वताच्या स्वार्थासाठी विकास करून घ्यायचा , हे योग्य वेळी मतदार दाखवून देतील , असे खडे बोल त्यांनी सुनावले . महिलांचा तसेच गोर गरीब कष्टकरी , कामगार , शेतकरी यांचा आदर करणारा सुधा भाऊ नेता आहे , त्यांनी सर्व समाजाच्या व्यक्तीस रोजगार दिला , म्हणूनच सर्वांना सुख सोई मिळण्यासाठी , सर्वांचे प्रश्न सुटण्यासाठी सुधाकर भाऊ घारे आमदार होणे गरजेचे आहे , असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर हिराजी पाटील , भाई कोतवाल यांचे प्रवेश द्वार सुधा भाऊ तुमच्या आमदार निधीतून करू , म्हणूनच ” भात गिरणीचा विजय हा फक्त ट्रेलर होता , पिक्चर अभी बाकी है ” , असा टोला त्यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर लगावला.