![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” कर्जत तालुक्यात वर्षावासाला सुरुवात “,,बीड येथे होणार भव्य उद्घाटन , अध्यक्ष ” बबन गायकवाड ” यांनी केले आमंत्रण….
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध सभा) ” तालुका शाखा कर्जत ” संस्कार विभाग ” या धम्म संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वर्षावास प्रवचन मालिका ” आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ” या कालावधीमध्ये संपुर्ण तालुक्यात राबविला जाणार असून या मालिकेचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी दुपारी २.०० ते सायं. ५.०० वा. ठिकाण बीड बु. बुद्धविहार ता. कर्जत, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे . तरी सर्व धम्म बांधव, महिला भगिनी , माजी श्रामणेर, केंद्रिय शिक्षक, बौद्धाचार्य, समता सैनिक दल, उपासक, उपासिका, ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे, अशी विनंती व आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत तालुका अध्यक्ष बी.एच. तथा बबन गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष – बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर , ट्रस्टी – आद. व्हि. एस. मोखळे यांच्या मार्गदर्शनानुसार धम्मदेसना ” पुज्यनिय भंत्ते महेंद्र बोधी थेरो ” हे करणार असून
सुत्रसंचालन आयु. एल. एम. भालेराव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. राजेश मनोहर ढोले – उपाध्यक्ष संस्कार ,प्रास्ताविक बाळू देसाई – अध्यक्ष वि.क्र. ७ , ज्येष्ठ बौद्धाचार्य मनोहर ढोले – अध्यक्ष वि.क्र. ९ व सर्व बौद्धाचार्य , के. के.गाढे – संस्कार सचिव महाराष्ट्र राज्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . सुत्रपठण – दु. २.०० वा.,कार्यक्रमाचे उद्घाटन दु. २.३० वा. मान्यवरांचे स्वागत व मनोगत पार पडणार आहे.
सदरच्या वर्षावास कार्यक्रमास रायगड जिल्हा संस्कार उपाध्यक्ष पी.एस. गायकवाड हे ” वर्षावास मालिकेचे महत्व ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत . तर कोषाध्यक्ष – सुर्यकांत गायकवाड , उपाध्यक्ष – राजेश मनोहर ढोले (संस्कार) , संजय मारूती जाधव – पर्यटन , धनाजी जाधव – संरक्षण , ज्योती भिमराव गायकवाड (महिला) , अनिल गायकवाड – नियोजन , हरिशचंद्र सोनावळे – आरोग्य व शिक्षण , गौतम गणपत गायकवाड – प्रसिध्दी , हिशोब तपासणीस – भिमराव दुदांजी रोकडे , सचिव – रोशनी विनोद शिंदे संस्कार , विजय बालु शिंदे – संस्कार , गणेश हाशा जाधव – पर्यटन , संतोष रोकडे – पर्यटन , रमेश शिंदे – संरक्षण , मुकुंद देसाई – संरक्षण , मनिषा संतोष शिंदे (महिला) , सुनंदा बालु गायकवाड (महिला) , रूपेश गायकवाड – नियोजन , पांडु सोनावळे – नियोजन , भिमराव बाबू गायकवाड , अशोक गणपत रोकडे – आ.व शि. , अशोक दुधसागर – प्रसिध्दी , मोहन अर्जुन धनवटे – प्रसिध्दी , संघटक – भगवान पंडित , बापू घोडके , अनंता गायकवाड , रमेश बा. ससाणे , रघुनाथ गायकवाड , मनिषा र. जाधव , मनिषा फाळे , आदी व कर्जत तालुक्यातील राजकीय – सामाजिक – शैक्षणिक व धार्मिक – सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या वर्षावास कार्यक्रमास सर्व बौद्ध बांधव व महिला भगिनींनी उपस्थित रहावे , असे निमंत्रक अध्यक्ष – आयु. बी. एच. तथा बबन गायकवाड तालुका शाखा कर्जत व महासचिव – एल. एस. भालेराव यांनी केले आहे .