लोणावळा (प्रतिनिधी): पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी डॅम येथे आज रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
पावसाळी सीजन मध्ये विविध ठिकाणावरून लाखो पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा शहरात दाखल होतात. त्यातच पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी डॅम येथील सांडव्यातून व पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते त्यातच आज रविवारी भुशी डॅम येथे पर्यटकांनी अफाट गर्दी केली असून लोणावळा ते भुशी डॅम मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.