Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमंदिर कारवाई प्रकरणी आमदार रमेश पाटील यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट...

मंदिर कारवाई प्रकरणी आमदार रमेश पाटील यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट…

खोपोली(दत्तात्रय शेडगे)
कल्याण मोहने येथील मंदिरावरील कारवाई प्रकरणी आमदार रमेश पाटील यांनी शिष्टमंडळासोबत घेतली पोलिस उपायुक्तांची भेट नुकतीच घेतली मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून संतप्त जमावाचा पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.

यामुळे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी मोहने येथील मंदिराच्या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांनी शिष्टमंडळासोबत कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन स्थानिक भूमिपुत्रांवरील गुन्हे मागे घेण्याची व मंदिर उभारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.


मोहने येथे जुने गावदेवीचे मंदिर होते.ते मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे परंतु कोणतीही नोटीस न देता महापालिकेच्यावतीने सदरच्या बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही कारवाई हेतूपुरस्पर करण्यात आलेली असून या कारवाईमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

यावेळी मनपा प्रशासनाने मंदिराच्या कामात सहकार्य करणे गरजेचे आहे अन्यथा स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आंदोलनाचा पवित्रा घेतील असे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांशी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा असुन तोपर्यंत सर्व ग्रामस्थांनी शांत राहावे असे आमदार रमेश पाटील यांनी आवाहन केले.


यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, देवानंद भोईर, शसुभाष पाटील. अॅड. भावेश पाटील, . सतीश देशेकर, श्री. अशोक मुरकुटे, . सुभाष भाबडे तसेच कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page