if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेरळ ग्रामपंचायती मधील कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी , पाणी पुरवठा कर्मचारी, दिवाबत्ती कर्मचारी यांचे गेली दहा महिन्यापासून थकीत असलेले पगार तसेच बँकेतून घेतलेल्या कर्जापोटी ग्रामपंचायतीने कर्मचा-यांच्या पगारातून कपात केलेली बँकेच्या हप्त्याची रक्कम बँकेत जमा न केल्याने महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेना प्रणित युनियनच्या ग्रामपंचायत कामगारांनी दिनांक ११ मार्च, २०२४ पासून नेरळमधील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, या ठिकाणी काम बंद आंदोलन केले होते , या आंदोलनामुळे संपूर्ण नेरळ शहरातील स्वच्छता व इतर कामांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून आल्याने सर्वच ठिकाणी हाहाकार माजल्याने अखेर प्रशासनाला ” नमती भूमिका ” घेवून २ महिन्यांचा पगार व उर्वरित पगार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण देण्याचे लेखी आश्वासन कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिल्यावर हे महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेना प्रणित कामगारांनी काम बंद आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेतले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुभाष गणपत नाईक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना युनिट यांनी पुकारलेल्या या काम बंद आंदोलनामुळे कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी नेरळ ग्रामपंचायतीला घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले असून याकामी विस्तार अधिकारी यांची नेमणूक केली आहे . नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांचे थकीत प्रकरणामुळे येथील एक कामगार यांनी आत्महत्या केली असल्याने तरीही ग्रामपंचायत प्रशासन यावर कुठलेच पाऊल उचलत नसल्याने नेरळ ग्रामपंचायतीचा ढोबळ कारभार चव्हाट्यावर आला होता.
या काम बंद आंदोलनास मनसे चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , कर्जत ता. अध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर , जिल्हा सचिव समीर चव्हाण , तालुका सचिव अक्षय महाले , कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे , नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण , जिल्हा महिला सचिव आकांक्षा शर्मा , त्याचप्रमाणे अनेक मनसे पदाधिकारी व सैनिकांनी या काम बंद आंदोलनाकडे जातीने लक्ष देवून नियोजन पद्धतीने हे आंदोलन यशस्वी केले . या बंद आंदोलनास इतर सर्व पक्षाने पाठींबा दर्शवून सहकार्य केले होते.