if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या वतीने सहकार निवासी मार्गदर्शन शिबीर दिनांक ६ व ७ जानेवारी २०२४ स्थळ – डिस्कव्हर रिसॉर्ट, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड येथे प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते शनिवार, दिनांक ६ जानेवारी, सकाळी ठिक १०.०० वा. होणार आहे , अशी माहिती सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी आज आयोजित केलेल्या रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषदेत दिली.
सहकार क्षेत्रातील नवनवीन माहिती सहकार सेनेतील मान्यवर यावेळी आयोजित केलेल्या दोन दिवसीय शिबिरात देणार असून राज्यातील ३०० पदाधिकारी या शिबिरास उपस्थित रहाणार आहेत . या शिबिरातील माहिती घेवून आपल्या भागात सहकार क्षेत्रात बँकांचे , पतसंस्थांचे , व मायक्रो कंपनी बँका पैशांचे कर्ज देवून नागरिकांवर , महिला बचत गट , व तरुणांना करत असलेल्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी या शिबारातील माहितीचा उपयोग होणार आहे . कर्ज घेणाऱ्या महिला व इतरांना मोयक्रो कंपनी ज्या पद्धतीने त्रास व जाचक अटी लावून कर्ज वसुलीसाठी तगादा लावतात , याविरोधात सक्षम माहिती असलेले मनसे ” तरुणांची फौज ” यानिमित्ताने राज्यात तयार होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगून पक्षाचे सर्वेसर्वा मा. राजसाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन देखील राज्यातील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लाभणार असल्याने या शिबिराकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
या शिबिरास प्रमुख उपस्थिती श्री. बाळा नांदगावकर (मनसे नेते, मा. गृहराज्यमंत्री ) , श्री. अमितसाहेब ठाकरे ( मनसे नेते, अध्यक्ष मनविरो ) , अनिल शिदोरे (मनसे नेते) , नितिन सरदेसाई (मनसे नेते, मा.आमदार ) , अविनाश अभ्यंकर (मनसे नेते ) , शिरीष सावंत (मनसे नेते ) , संजय चित्रे (मनसे नेते ) , प्रमोद ( राजु ) पाटील (मनसे नेते, आमदार ) , जयप्रकाश बाविस्कर (मनसे नेते, मा.आमदार ) , राजेंद्र वागस्कर (मनसे नेते ) , अभिजीत पानसे (मनसे नेते) , संदीप देशपांडे (मनसे नेते) , राजु उंबरकर (मनसे नेते) , अविनाश जाधव (मनसे नेते) , संतोष नागरगोजे (सरचिटणीस, अध्यक्ष-शै.से.) , सौ. शालिनी ठाकरे (सरचिटणीस) , सौ. रिटा गुप्ता (सरचिटणीस) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला मनसे सहकार सेना अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे ,जिल्हा अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , उपजिल्हा अध्यक्ष सचिन करणुक , पर्यावरण सेना जिल्हाध्यक्ष अभिजित घरत , जिल्हा सचिव अक्षय महाले , तालुका अध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर , तालुका सचिव समीर चव्हाण , माजी नगरसेवक धनंजय दुर्गे , तालुका उपाध्यक्ष यशवंत भवारे , नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण , महिला कर्जत शहर अध्यक्ष भारती कांबळे , उपशहर अध्यक्ष संकेत घेवारे त्याचप्रमाणे अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.