Friday, November 22, 2024
Homeपुणेवडगाव"मनसोक्त आंबे खावा, बक्षीस जिंका " या अनोख्या स्पर्धेचे वडगावात आयोजन...

“मनसोक्त आंबे खावा, बक्षीस जिंका ” या अनोख्या स्पर्धेचे वडगावात आयोजन…

वडगाव मावळ : मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे व मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अबोलीताई मयुरदादा ढोरे यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 17 मधील बच्चे कंपनीसाठी “मनसोक्त आंबे खावा..अन बक्षीस मिळवा” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना काळात सर्वांवरच अनिश्चित बंधने असल्याने त्यातल्या त्यात बच्चे कंपनी मध्ये घरात बसून उदासीनता निर्माण झाली होती. या काळात लहान मुलांपासून ते जेष्ठांसाठी नगराध्यक्ष मयुरजी ढोरे हे विविध आॉनलाईन स्पर्धांचे आयोजन करत होते. यादरम्यान लहान मुले एकीकडे शाळेतील अभ्यास व दुसरीकडे विविध आॉनलाईन स्पर्धा मध्ये सहभागी होत असे.

आता कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने या लहान बालगोपाळांना मनमुराद आनंद लुटता यावा या उद्देशाने मोरया महिला प्रतिष्ठान च्या संकल्पनेतून आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रभाग क्रमांक सतरा मधील तब्बल 167 लहान मुलांनी सहभाग नोंदवला. दोन गटात झालेल्या या स्पर्धेत आराध्या सुतार, श्लोक लोखंडे, शिवान्या सावंत, श्रेयश देसाई, सार्धक धनावडे, ओंकार ढोरे, मेघराज पाटील, समया उके, रुपेश कांबळे या स्पर्धकांनी अनुक्रमे विजय संपादन करत सर्वच मुलांनी पालकांसह स्पर्धेचा आनंद लुटला.

तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने वडगाव साखळी रोड परिसरात नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते बाळासाहेब ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, रा. काॅ. युवक उपाध्यक्ष युवराज ढोरे, युवा उद्योजक सौरभ ढोरे, प्रभाग अध्यक्ष प्रकाश ढोरे, यशवंत शिंदे आणि प्रभागातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागातील या अनोख्या कार्यक्रमाने सर्वच बच्चे कंपनी आणि पालकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच या कार्यक्रमादरम्यान बारावीच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या प्रभागातील कु. नेहा अनंतराव जांभुळकर 80%, कु. श्रावणी श्रीकृष्णराव महाजन 64%, कु. प्रियंका गणेशराव ठाकरे 70%, कु. यश पवनराव बोरीटकर 70% या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करताना नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांनी सर्वांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page