Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनातील " नकारात्मक लहरी " घालवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात रहा - समुपदेशक देवश्री...

मनातील ” नकारात्मक लहरी ” घालवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात रहा – समुपदेशक देवश्री जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” निसर्ग आणि मानसशास्त्र ” यांचा अगदी जवळचा संबंध आहे . म्हणूनच मनातील ” नकारात्मक लहरी ” घालविण्यासाठी जास्तीतजास्त ” निसर्गाच्या सानिध्यात ” रहाण्याची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण मत कर्जत मनःस्वास्थ्य क्लिनिक च्या समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले आहे.

आता पावसाळा सुरू झाला आहे , खूप छान पाऊस पडत आहे , सगळीकडे हिरवळ, मातीचा वास, या वातावरणात गरम वाफाळता चहा , गरम गरम भजी खाणे , याशिवाय सुख म्हणजे अजून काय असतं ? म्हणूनच आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या मनावर , शरीरावर प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष पणे परिणाम होत असतात. यासाठी आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
खूप जणांनी वेगवेगळे अनुभव घेतले असतील , उदाहरणार्थ जर कोणी मयत झाले असेल किंवा आपण जर कुणाच्या निधन झाले त्या ठिकाणी गेलो असेल आणि घरी आल्यावर आपल मन खूप उदासच असतं , किंवा आपण फार क्रिकेट बघत असू आणि जर कधी म्याच आपण जिंकलो किंवा वर्ल्ड कप आपल्याला मिळाला तर आपल्याला आनंद होतो किंवा छान वाटतं . मनासारखी गोष्ट घडली तर चांगलंच वाटतं , पण या घटनेतून ज्या लहरी / ऊर्जा वातावरणातून सकारात्मक किंवा नकारात्मक लहरी (ज्याला आपण vibes म्हणतो) त्या जाणवतात.
आपल शरीर निसर्गाच्या लहरी बरोबर कनेक्ट आहे , म्हणूनच कधी कधी खूप जणांना पौर्णिमा , अमावस्या जवळ आली की किंवा त्या दिवशी खूप त्रास जाणवतो , तर तो का जाणवतो तर चंद्राची दिशा पृथ्वीपासून बदलते त्यामुळे पौर्णिमा व अमावस्याला वेगवेगळे त्रास जाणवू शकतात , म्हणजेच काय तर आपल्या मनावर आजूबाजूच्या गोष्टींचा , निसर्गाचा परिणाम होत असतो , यावर समुपदेशक देवश्री जोशी यांनी प्रकाश टाकला.

ज्यांना खूप जास्त नैराश्य , नकारात्मक विचार येत असतात , सातत्याने काहीच करू नये , अशी भावना येत असते , त्यांनी नक्कीच निसर्गाच्या जवळ जाण्याची त्याला अनुभवण्याची वेळ आली आहे , याचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की , कुठली पण एका झाडाची ” बी किंवा छोटंसं रोप ” घरी घेऊन या , बी आणली तर कुंडीमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये माती खणून त्यामध्ये रोप लावा , त्याला रोज पाणी घाला , खत घाला रोपाला सूर्यप्रकाश द्या , हळू हळू रोप नक्कीच वाढेल त्याला बहार येईल , त्याच्यावरून मायेन हात फिरवा , कालांतराने त्याला खूप सुंदर फुल किंवा फळ येईल आणि त्याचा तुम्हाला होणारा आनंद खूप जास्त होईल , असं का ? तर आपण त्या झाडाला आपलं ” सर्वस्व ” देऊन जपलेलं असतं . जशी ” गरोदर माता ” नऊ महिने आपल्या बाळाची काळजी घेते, ती त्या बाळाशी सतत अखंड सवांद साधत असते , त्यामुळेच पहिल्यांदा बाळ पृथ्वीतलावर आल्यांनतर त्याला आईचा स्पर्श लगेच समजतो , कारण नऊ महिने तिने घेतलेली काळजी.
निसर्गाचं देखील तसेच आहे , आपण जर निसर्गाच्या सानिध्यात गेलो खूप राहिलो तर नक्कीच आपल्याला पण वेगवेगळे अनुभव येतील. निसर्ग आपल्याला त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टी फुकट देत असतो , त्या फक्त आपण घ्यायच्या आहेत. रोजचा सूर्यप्रकाश ते अगदी पौर्णिमेचा नयनरम्य चंद्रप्रकाश . एखादं झाड जसं त्याच्याकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला देतो त्याच्याकडे तो काहीच ठेवत नाही, कितीही सुवासिक फुल असू दे किंवा मधुर फळ असू दे , झाड त्याच्याकडे न ठेवता रात्री ते फुल उमल्यानंतर झाडावरून जर कोणी तोडलं नाही तर ते जमीनीवर पडतं आणि झाड परत दुसऱ्या दिवशी सुवासिक फुलाच्या उमळण्यासाठी तयार असतं. कुठलंही झाड स्वतःकडे फुल,फळ ठेवतं नाही तसंच माणसाने पण कळत नकळत कोणाच्या उपयोगाला आलो तर त्याचा बागुलबुवा करू नये.

ज्याप्रमाणे प्रत्येक झाडाला सुद्धा पानगळ भोगावी लागते , त्या प्रमाणेच प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाईट , दुःखी – कष्टी दिवसांचा सामना करावा लागतो आणि त्यातून जो माणूस / मनुष्यरूपी देह आपला बनतो तो अगदी नवीन झाडाला पालवी फुटल्याप्रमाणे टवटवीत , फ्रेश बनतो. ” जीवन हे कालचक्र ” आहे , चांगल्या दिवसानंतर , वाईट दिवसांचा पण सामना हा प्रत्येकालाच करावा लागतो , तो त्या झाडाप्रमाणे आपले पाय आपली मूळ किती घट्ट रोवून उभा आहे ह्यावर सगळं अवलंबुन असतं . जितकं झाडाचं खोड जुनं तितकं ते परिपूर्ण झालेलं असतं कारण अनेक पावसाच्या व वादळाच्या तडाख्यातून त्याने स्वतःला सावरत उभं ठेवलेलं असतं. अगदी फुलं , पानं , फांद्या सगळ्यांनी साथ सोडली तरी खोड आणि मूळ त्याची साथ सोडत नाही तसेच आपलं पण आहे , किती पण दुःख, वाईट परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येऊ दे आपल्याला चांगल्या वागण्याची, चांगल्या विचारांची आणि स्वतः वरच्या विश्वासाची साथ नेहमीच आपल्यासोबत असते . त्याची सतत स्वतः जाणीव देत रहायची आहे आणि आपण हे नक्कीच निसर्गाकडून शिकु शकतो , असा विश्वास समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केला .आपल्या जीवनाची अजून काही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी आताच मनःस्वास्थ्य क्लिनिक – कर्जत समुपदेशक देवश्री जोशी – ९५२७६७६००८ यावर संपर्क करा.
- Advertisment -

You cannot copy content of this page