Friday, August 1, 2025
Homeपुणेलोणावळामनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खंडाळ्यात सचिन कचरे यांचे एक...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खंडाळ्यात सचिन कचरे यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…

लोणावळा (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खंडाळा गावात सचिन कचरे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज केले.
सचिन कचरे यांच्या या उपोषणाला खंडाळा परिसरातील विविध नेते मंडळी, सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुले, महिला यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाज आंदोलन सातत्याने मोर्चे, आंदोलने, उपोषणे करत आहेत.सरकार याची दखल घेत नसल्याने पुन्हा एकदा मराठ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
काल रात्री महाराष्ट्र शासनाच्या पथकाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दोन महिन्याचा कालावधी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मागून घेतला आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी चक्री उपोषण सुरू ठेवण्याचे घोषित केले होते. त्यांच्या या मागणीला व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आज खंडाळा गावात सचिन कचरे यांनी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत पाठिंबा दिला आहे.तसेच खंडाळा ग्रामस्थांकडून राजकीय नेते मंडळी व पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page