लोणावळा : मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते कार्ला येथील भाऊसाहेब हुलावळे आणि वेहेरगाव येथील कैलास पडवळ यांनी दि.10 फेब्रुवारी पासून वाकसई येथील संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिर येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सरकारने अलिकडेच काढलेल्या सगेसोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी व विशेष अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावा यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब हुलावळे व कैलास पडवळ यांनी दि.10 फेब्रुवारी पासून वाकसई येथील संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.या उपोषणाला पाच दिवस पूर्ण झाले असून.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव मोठया संख्येने त्यांची उपोषण स्थळी भेट घेऊन पाठिंबा दर्शवीत आहेत.
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व कायदा पारित व्हावा याकरिता आज सकल मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला लोणावळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला असून बाजारपेठा व व्यवसाय बंद ठेवण्यात आल्या आहेत.
शासनाने लवकरात लवकर अधिवेशन बोलवत अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात करावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून जनजागृतीसाठी लोणावळा ते वडगाव, तळेगाव दरम्यान दुचाकी रॅली देखील काढण्यात आली.