कार्ला (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सोमवार रोजी कार्ला येथील काही युवकांनी जलसमाधी आंदोलन केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. काही गावोगावी उपोषण करण्यात येत आहे.आज मावळातील कार्ला तलावात काही युवकांनी जलसमाधी आंदोलन केले. “एकच मिशन मराठा आरक्षण” अशी हाक देत या तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली.
तसेच आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.या युवकांना समर्थन देण्यासाठी मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने याठिकाणी जमले होते.