if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
( लोणावळा प्रतिनिधी: श्रावणी कामत ) लोणावळा :मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ती स्थगिती उठवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये निवेदन पत्र देण्यात आली.
मराठा आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करावे, आरक्षण मिळेपर्यंत पोलीस भरती थांबवावी, मराठा क्रांती मोर्चामधील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत, कोपर्डी येथे मराठा भगिणींवर करण्यात आलेल्या अत्याचारातील दोषींवर कडक कारवाई करावी, आंदोलनात शहीद झालेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळावी, कुटुंबांना पेन्शन व स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्यात यावा इत्यादी मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत, नाहीतर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल ही भावना पत्राद्वारे सरकारकडे पोहचवावी असे निवेदन यावेळी देण्यात आले त्यावेळी डॉ. किरण गायकवाड, उमेश तारे, भारत चिकणे, नारायण पाळेकर, रुपेश नांदवटे, अरुण लाड, नरेंद्र पाळेकर, भरत भरणे, संतोष येवले, बाबाजी कुटे इ. उपस्थित होते.