लोणावळा(प्रतिनिधी): समाजाप्रती कर्तव्य समजुन मराठा आरक्षण मिळेपर्यंत शिवसेना(उबाठा)पुणे जिल्हासंघटक मा.पुणे जिल्हाप्रमुख मच्छिन्द्र बबनराव खराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.याबाबतचे पत्र मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दि.30 ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. माझ्या समाज बांधवांची अपेक्षा आहे की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राजकिय दृष्ट्या मी कुठेही कार्यरत असु नये, हिच समाज भावना लक्षात घेता मी समाजाप्रती निष्ठा व कर्तव्य समजुन मी माझ्या शिवसेना पुणे जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देत आहे.
शिवसैनिक म्हणुन मी स्व. बाळासाहेबांचा व आपला सदैव एकनिष्ठ राहिल या बाबत कुठलीही शंका मनात असण्याचे कारण नाही.मला आशा आहे की माझ्या भावना लक्षात घेऊन माझ्या शिवसेना जिल्हा संघटक पदाचा राजीनामा स्विकारावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.