![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरांतर्गत इंग्रजी व इतर भाषेतील दुकानांच्या , बँकेच्या , इतर सदर बाजारपेठ व कुठल्याही जागेवर झळकलेले फलक – पाट्या बदलून तातडीने मराठी पाट्या सक्तीचे करण्याबाबत कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना क्रोध निवेदन देवून मा. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दंडात्मक व पोलीसी कारवाई कारवाई करावी , असे घटनात्मक आदेश महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे यांनी मा. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , युवा सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व रायगड जिल्हा प्रमुख जितेंद्र दादा पाटील व महेंद्र निगुडकर – कर्जत तालुका प्रमुख – महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे दिले आहे . त्यामुळे आता पुढे काय होणार , पालिका प्रशासन कडक कारवाई करणार , की कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी न ऐकणाऱ्या दुकानदारांवर ” खळ खट्याक ” हि मनसे स्टाइल वापरून त्यांना सरळ करणार , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार दुकानदारांनी मराठी भाषेतील ठळक अक्षरात लिहिलेल्या पाट्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठी भाषेला ” अभिजात भाषेचा दर्जा ” मिळावा , या विषयासाठी गेली १७ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखंड लढा देत आहे . याआधी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत शहरातील इंग्रजी भाषेतील फलकांना काळे फासण्यात आले होते . त्यातून ही काही दुकानदारांनी आडमुठी भूमिका घेत पाट्या बदलण्यात कुचराई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
कर्जत पालिका प्रशासनाची याबाबतीत जबाबदारी आहे , की सदर दुकानदारांवर सक्तीचे कारवाई करीत पाट्या या मराठीत लावून घ्याव्या . मात्र याअगोदर देखील असे कर्तव्य पालिका प्रशासनाने बजावले नसल्याने मा. सुप्रीम कोर्टाचां आदेश न जुमानले सारखे आहे . यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये , म्हणून पुढील १५ दिवसांत यांत बदल न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व ” पाट्या फोडून टाकेल ” व त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील , असे क्रोध निवेदन मनसे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिले आहे.
सदरचे निवेदन कर्जत शहर प्रमुख – राजेश साळुंखे यांच्या समवेत अक्षय महाले – सचिव रायगड जिल्हा , नगरसेवक तथा कर्जत शहर उपाध्यक्ष हेमंत ठाणगे , रांकित शर्मा – कर्जत शहर उपाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.