if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्रात शिवसेना – भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी महायुतीची सत्ता आहे . त्यामाध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत जागा वाटप होणार असून जो कोणी उमेदवार रायगड व मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून दिला जाईल त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे काम आम्ही करून देशात मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू , असे मत मावळ, रायगड लोकसभा जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पेण येथे कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मांडले.
देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांनी १० वर्षांत केलेले कार्य सांगत रायगडात भविष्यात महायुतीचा धर्म सर्वांनी पाळावा , जर युतीचा धर्म न पाळता कुणी राष्ट्रवादीचा आमदार कर्जत मतदार संघात घडविण्याचे मनसुबे आखत असतील , तर सूनीलजी तटकरे तुमचाही कडेलोट झाल्याशिवाय रहाणार नाही , असे खडे बोल कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सुनावले . यावेळी या बैठकीस रायगड व मावळ लोकसभा मतदार संघाचे आमदार , जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्जत – खालापूर मतदार संघात सुरू असलेल्या सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील पदाधिकारी व त्यांना साथ देणारे त्यांचे नेते सुनील तटकरे यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी कडक भूमिका घेत , जोपर्यंत शिवसेना कर्जत – खालापूर मध्ये जिवंत आहे , तोपर्यंत कुठला ” माई चा लाल ” आम्हाला पाडू शकत नाही , अशी ” सिंह गर्जना ” देखील त्यांनी केली.
बदलल्या परिस्थितीत राजकीय समीकरणे व वातावरण बदलत असताना राष्ट्रवादीचे नेते सूनिलजी तटकरे साहेबांनी देखील आपली भूमिका बदलली पाहिजे , असे सांगत , जर कर्जतचां आमदार घडविण्याचे मनसुबे आखत असाल तर , तुमचाही कडेलोट झाल्याशिवाय रहाणार नाही , असे राजकीय भूकंप त्यांच्या बोलण्याने करून , त्यांचे हे बोल खरे होणार की कसे ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.
आम्ही आमदारकी भोगली आहे , आमचे स्वप्न पूर्ण झाले आहेत , मात्र महायुतीचा धर्म न पाळल्यास यावेळी हे सहन होणार नाही , असा सज्जड क्रोध मत रायगडाचे धुरंधर नेते , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या भूमिकेबद्दल संशय घेत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मत मांडले . मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर तटकरे यांची हमी घेतली जाईल , असे भाकीत देखील त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले . त्यामुळे ऐन होळीत येथील राजकीय वातावरण गरम झाले असून पुढील राजकीय होम कोण पेटवतो , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.