भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणजे ” करेक्ट कार्यक्रम ” करणारे ” डॅशिंग नेतृत्व “. संपूर्ण मतदार संघातील कार्यकर्त्यांची ताकद त्यांनी योग्य नियोजन करून ” बाळासाहेब भवन ” येथे एकत्रित आणून जोरदार ” शक्ती प्रदर्शन ” करून ” रेकॉर्ड ब्रेक ” गर्दीत ढोल ताशांच्या गजरात , घोषणांच्या आतिषबाजीत भव्य रॅली काढून ” विजयरथातून ” सर्वाँना अभिवादन करत मोठ्या उत्साहात प्रशासकीय भवन येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . हि रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघून सर्वांनीच ” आमदार साहेब , नाद नाही तुमचा ” असे बोल व्यक्त करत मतदारांनी त्यांच्या विजयासाठी भरभरून आशीर्वाद व शुभेच्या दिल्या.
आपल्या ” कार्यकर्तृत्वाचा ” ठसा उमटवून ” विकासाची गंगा ” प्रत्येक भागात आणून कर्जत खालापूर मतदार संघात ” नंदनवन ” घडविणारे आमदार महेंद्र शेठ थोरवे हे रायगडच्या राजकीय पटलावर ” कर्तृत्ववान नेतृत्व ” म्हणावे लागेल . रायगडाच्या भूमीत आजपर्यंत कुठल्याच आमदार – खासदारांनी एव्हढ्या कमी वेळात काम केले नसेल ते त्यांनी अवघ्या अडीच वर्षांत करून दाखवले . हिच त्यांच्या ” विजयाची ” पोच पावती म्हणावी लागेल .
आज मंगळवार दिनांक २९ ऑक्टोंबर २०२४ हा दिवस सर्वांच्याच लक्षात रहाणारा दिवस ठरला . गगनातून नजर फिरवली तिथे ” भगवे वादळच ” जणु धरतीवर आल्याचे दृश्य ” याची देहा – याची डोळा ” सर्वांनीच अनुभवला . सार्वत्रिक निवडणुक – २०२४ च्या या निवडणुकीत सर्वांत जास्त उमेदवारी अर्ज भरताना एव्हढी ” अभूतपूर्व गर्दी ” कुठल्याच उमेदवाराची नव्हती , असेच हे दृश्य होते . शिवसेनेचे आमदार व मित्र पक्ष शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्ष – आरपीआय आठवले गट , अश्या महायुतीतील उमेदवार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे हे ” व्हिजन – २ ” च्या पर्वासाठी पुन्हा एकदा सामोरे जात आहेत.
यावेळी विजयरथात उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे , मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आरपीआय चे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , विजय जाधव , सुनील गोगटे , अशोक ओसवाल , जिल्हा सह संपर्क प्रमुख संभाजी जगताप , सौ. मीना ताई थोरवे , सौ . मनिषा ताई भासे , यांच्या समवेत कर्जत ता. प्रमुख सुदाम दादा पवाळी , खालापुर ता. प्रमुख संदेश पाटील , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , विधानसभा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , ऍड. संकेत भासे , देशमुख , आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , भाजप अध्यक्ष राजेश भगत , त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील शिवसेना – युवासेना – महिला आघाडी पदाधिकारी व जवळपास ४० हजारांच्या संख्येने महायुतीतील शिवसैनिक व मित्र पक्षाचे कार्यकर्ते महिला वर्ग या भव्य रॅलीत उपस्थित होते . हे ” भगवे वादळ ” म्हणजेच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विजयाची नांदीच ” , असे दृश्य सर्वांनी अनुभवला .