Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळमहाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक संपन्न...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक संपन्न…

मावळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक वडगांव मावळ येथे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी तालुका कार्यकारणी पुनर्बांधणी व पक्ष विस्तार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची माहिती घेऊन उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकी दरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. गणेश आप्पा सातपुते,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हेमंत संभूस, पिंपरी चिंचवड अध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पुणे जिल्हा रस्ते आस्थापना अध्यक्ष सचिन भांडवलकर, मावळ तालुका कोर कमिटी सदस्य सुरेश जाधव, संजय शिंदे, ज्योतीताई पिंजण, तानाजी तोडकर, अनिल वरघडे आदी मान्यवरांसह आजी – माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page