Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळामहाराष्ट्र राज्य कामगार संघाच्या दोन दिवसीय लोणावळ्यातील संमेलनाचा समारोप आमदार सचिन अहिर...

महाराष्ट्र राज्य कामगार संघाच्या दोन दिवसीय लोणावळ्यातील संमेलनाचा समारोप आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने शनिवार दि.1 व रविवार दि.2 जुलै रोजी दोन‌ दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन इम्पिरियल ग्रॅंडले रिसॉर्ट, तुंगार्ली रोड, इंदिरा नगर चौक येथे संपन्न झाले.
रविवार दि.2 रोजी वरील‌ ठिकाणी सम्मेलनाचा समारोप झाला. या समारोप प्रसंगी माजी राज्यमंत्री शिवसेनेचे उपनेते,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी उपस्थित राहून सम्मेलनात मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नावर संघटनेची भूमिका मांडण्यात आली.यामध्ये देशस्तरावर 36 कायदे एकत्रित करून कामगार चळवळीला संपविण्याचा प्रयत्न होत आहे.
याबाबत जनजागृती या कामगार नेत्यांमध्ये व्हावी या हेतूने हे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.जगाच्या दृष्टीने भारतामध्ये असंघटित शक्तीची मोठी संख्या वाढत चालली आहे. त्यादृष्टीने 96% लोक असंघटित असून फक्त 4% लोक संघटित आहेत. म्हणजे चार टक्के लोकांना सर्व सुख सुविधा मिळताहेत बाकी 96 % लोक हे कामगार आहेत परंतु त्यांना कुठल्याही सुख सुविधा मिळत नाहीत. या असंघटित कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी जनजागृती पर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती आमदार सचिन अहिर यांनी अष्ट दिशा प्रतिनिधिशी बोलताना दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page