Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळामहाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेचे वार्षिक अधिवेशन लोणावळा...

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेचे वार्षिक अधिवेशन लोणावळा येथे उत्साहात संपन्न…

लोणावळा: महाराष्ट्र राज्यातील नागरी स्थानिक स्वराज संस्थांचे प्रशासन यश्वस्वीपणे हाताळणारे महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेचे वार्षिक अधिवेशन लोणावळा येथील पाटीदार सेवा समाज सभागृहात उस्ताहात पार पडले.संघटनेचे अध्यक्ष व सिडको चे सह व्यवस्थापकीय संचालक श्री गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिवेशनाला राज्यभरातून विविध महानगरपालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, विविध जिल्ह्यांचे जिल्हा सह आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय व नगरपरिषद प्रशासन संचालनालय कार्यालयातील सह आयुक्त, उपायुक्त, विविध नगरपरिषद, नगरपंचायत चे मुख्याधिकारी व नुकतेचे सेवेत रुजू झालेले परिविक्षाधीन मुख्याधिकारी असे राज्यातील २०० हून अधिक अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.सकाळी १० वाजता दीप प्रज्वलनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त व संघटनेचे सरचिटणीस श्री प्रशांत रसाळ यांनी केली.
संवर्गातील अधिकारी असलेले श्री अजीज शेख यांची भारतीय प्रशासकीय (IAS) सेवेत निवड झाल्याबद्दल संघटनेमार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.अधिवेशना दरम्यान झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नुकत्याच शासनाने अधिसूचीत केलेल्या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अंतर्गत मुख्य अधिकारी संघटनेचे नामकरण “महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अधिकारी संघटना” असे करणेचा व अनुषंगिक नियमात सुधारणा करणे आणि संघटने मधे अतिरिक्त सचिव हे पद निर्माण करणे हे ठराव सार्वमताने मंजूर करण्यात आले.संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी श्री सुधाकर देशमुख यांनी १९९६ पासुनची संघटनेची ऐतिहासिक वाटचाल आपल्या मनोगतात व्यक्त केली.
शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले श्री अनिल मुळे यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा असतात आणि त्या अधिकाऱ्यांनी कशा पूर्ण केल्या पाहिजेत याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.मा मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव श्री बालाजी खतगावकर यांनी दूरध्वनी संदेशद्वारे शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषण करताना श्री गणेश देशमुख यांनी संवर्गाच्या आजवरच्या प्रगतीचा आलेख वाचला. शहरी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत असताना अधिकाऱ्यांनी पायाभूत सुविधांसोबतच सामाजिक सुविधा जसे की शिक्षण आणि आरोग्य सेवा यावर प्रमुख भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.त्याचप्रमाणे शासकीय सेवेत काम करत असताना एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपली प्रतिमा कशी जपावी व आपण कोणत्या मर्यादांचे पालन केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात विविध अधिकाऱ्यांनी मनोगते सादर करीत संघटनेप्रती आदर व अपेक्षा व्यक्त केल्या. संवर्गातील उल्लेखनीय काम करणाऱ्या निवडक अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री स्वरूप खारगे, सहायक आयुक्त पनवेल महानगरपालिका व श्रीमती स्मिता काळे, मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोणावळा नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने विशेष प्रयत्न केले. संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुनील बल्लाळ यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- Advertisment -

You cannot copy content of this page