Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडमहाराष्ट्र शासनाच्या पाली येथील मुलींच्या वस्तीगृहात 90 वा वर्धापन दिन साजरा...

महाराष्ट्र शासनाच्या पाली येथील मुलींच्या वस्तीगृहात 90 वा वर्धापन दिन साजरा…

अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पाली येथील मुलींच्या वसतिगृहाचा 90 वा वर्धापन दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास रायगड भूषण जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रसिका पाटील होत्या . प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . स्वागत गृहपाल श्रीमती नरहरे यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात त्या म्हणाल्या समाज कल्याण विभागाला स्थापन होऊन आज 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आज वर्धापन दिन साजरा करीत असून त्यानिमित्त मुली व कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन आणि मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे .
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला . त्यानंतर विद्यार्थिनींना जयपाल पाटील यांनी दैनंदिन कामे करताना अपघात कसे घडतात , त्यावेळी स्वतःची व इतरांची सुरक्षेसाठी 108 रुग्णवाहिकेचा वापर , स्वतःच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर करताच 20 व्या मिनिटाला पाली पोलिस ठाण्यातून लिंबाजी शेडगे , महिला पोलीस कर्मचारी नंदा शिर्के उपस्थित राहिले . त्याचबरोबर साप व विंचू दंशाच्या वेळी ,जंगल विभागातून रुग्णाला रस्त्यावरील रुग्णवाहिकेत आणताना चादरीत मध्ये कसे आणावयाचे याचे प्रात्यक्षिक व स्वयंपाक घरातील दुर्घटना बाबत माहिती दिली.
यावेळी डॉक्टर रसिका पाटील यांनी महिलांच्या आरोग्याबाबत वसतिगृहातील महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले . व त्यांच्या पूर्ण टीमने मोफत आरोग्य तपासणी केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ईशान कांबळे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी नेहा कांबळे हिने केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page