Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमहाराष्ट्र सुपर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड मधील तीन मुलींची निवड !

महाराष्ट्र सुपर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड मधील तीन मुलींची निवड !

क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांनी घडविले खेळाडू…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षा खालील तीन मुलींची ” महाराष्ट्राच्या सुपर लीग स्पर्धेसाठी ” निवड झाली असून या तिघांपैकी दोन खेळाडू कोल्हापूर येथे तर एक खेळाडू जळगाव येथे खेळण्यासाठी जाणार आहे . महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या वतीने नुकतीच पुणे इथे १९ वर्षाखालील मुलींची आमंत्रित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती .त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुलींची सुपर लीग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांच्या मार्गदर्शनाखाली या मुली आता पुढे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे नाव उज्वल करण्यासाठी २३ तारखेला खेळण्यासाठी जाणार आहेत.

पुणे इथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्य वतीने अंडर १९ मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या , यामधे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून संघ पाठवण्यात आला होता . यावेळी पुणे तीन मॅचेस मध्ये रायगड ची टीम ने दोन मॅचेस मध्ये हार आणि एक विजय मिळवला होता . यामधे बोलिंग मध्ये पेस बॉलर ” अंजली गोडसे ” हिने तर स्पिनर मध्ये ” समिधा तांडेल ” आणि ऑलरोंडार मध्ये ” रोशनी पारधी ” हिने चांगली कामगिरी केल्याने या तिघिंची सुपर लीग साठी निवड करण्यात आली आहे .रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेटला गेल्या तीन वर्षांपासून सुरवात करण्यात आली आहे , यासाठी असो. चे अध्यक्ष चंद्रकांत मते, संदिप पाटील आणि प्रशिक्षक तथा टीम मॅनेजर मनीषा अडबल हे खूप मेहनत घेत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये तसा ग्रामीण भाग जास्त असून मुलींनी क्रिकेट खेळणे हे अजून इथे मुरलेले नाही , मुंबई च्या जवळचां जिल्हा असला तरी अजुन इथे मुलींचे क्रिकेट खेळणे जास्त वाढले नाही , पण गेली तीन वर्षापासून चंद्रकांत मते ,संदिप पाटील आणि मनीषा अडबल हे रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेट कडे जास्त लक्ष देत असल्याने आज रायगड च्या तीन मुलींची निवड झाली असल्याचे दिसून येते.

या तीन खेळाडूंपैकी रोशनी पारधी ही महाड , समिधा तांडेल खोपोली तर अंजली गोडसे हि पनवेल मधील आहे . या तिघिंपैकी रोशनी पारधी आणि समिधा तांडेल ह्या कोल्हापूर इथे तर अंजली गोडसे ही जळगाव इथे सुपर लीग स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत .रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबळ यांनी या तिघीच्या पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page