if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली- दत्तात्रय शेडगे
पेन पूर्व विभागातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली ओळखली जाणारी महालमिर्या डोंगर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शेकापच्या श्रीमती मालतीताई रेखु आखाडे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता आहे, सर्वांना समान काम करण्याची संधी मिळावी यासाठी मावळते उपसरपंच राजेश्री शिंदे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली,यावेळी सदस्या मालती आखाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच जनार्दन भस्मा तर सहाय्यक म्हणून ग्रामसेवक दर्शन नखाते यांनी काम पाहिले, मालतीताई आखाडे यांची उपसरपंच पदी निवड होताच त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाल मिर्या डोंगरचे युवा नेते दिनेश खैरे, सरपंच जनार्धन भस्मा, मा उपसरपंच तथा सदस्य राजेश्री शिंदे, हाशा ठाकरे, गणपत पारधी महादेव उघडा, धानी भस्मा, सुलभा ठाकरे, मनीषा सोनार,देवकी जाधव , पेन तालुका धनगर समाज सल्लागार विठ्ठल बोडेकर, खजिनदार बाळू उघडे, अध्यक्ष राजू आखाडे, माजी सरपंच वृषाली खैरे, विजय उघडे, संजय तिवले, ग्रामस्थ जोमा ठाकरे, महादू खाकर, हरि काष्टे, रामा खाकर, कृष्णा पारधी, काशा निर्गुडा, देवजी निर्गुडा, नामदेव शीद, हासुराम वारगुडे, कमलाकर भस्मा, धर्मा गडखल, नरेश पिंगळा, हरी गडखळ, शरद शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, विठ्ठल झोरे, कर्मचारी प्रकाश तुपे, दिनेश मरगले, राकेश उघडे, दीपक खैरे झ रामा तिवले, भरत मरगला, आदी उपस्थित होते