Saturday, December 21, 2024
Homeपुणेमावळमहावितरण कर्मचाऱ्यांचे मुसळधार पावसात कौतुकास्पद काम..

महावितरण कर्मचाऱ्यांचे मुसळधार पावसात कौतुकास्पद काम..

कार्ला : कार्ला परिसरात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा विस्कळित झाला होता.त्यावेळी कार्ला विभागाचे महावितरण अधिकारी पवार साहेब व लोणावळा विभागाचे चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या काळात पूर असूनही जीवाची पर्वा न करता येथील वायरमन तसेच इतर कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली.

कमरेच्या वर पाण्यात शिरून आपली कामे चोख पार पाडली तसेच या सर्व पावसाळी अभावाचा कोणत्याही ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची दखल घेतकेलेल्या कार्यामुळे. कार्ला येथील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा खेड विभागीय अभियंत्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


आपण कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्या व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलेले पाहिले.परंतु अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्यावर आपण नेहमी परिसरातील वायरमन यांना दोषी ठरवत त्यांच्यावर टीका करत असतो.

अशा या टीकेचे धनी होणारे विज कर्मचारी मात्र सन्मानित होताना पाहिले नाही.परंतु यावेळी मात्र खेडचे मुख्य अभियंता गरुड यांनी अनोखा पायंडा पाडत पुराच्या काळात जीवाची बाजी लावत वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कार्ला कार्यालयांतर्गत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानित करून प्रोत्साहन दिले.

यावेळी गरुड यांच्यासह लोणावळा येथील उप अभियंता उमेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता अक्षय पवार,लाईनमन युवराज जाधव, रोहिदास मापारी,कैलास वखरे,अनिल पाटील, अमर कोंढाळकर, लक्ष्मण काळे, भरत हुलावळे,राजू घोजगे, अजय घरदाळे, कृष्णा मानकर आदी विद्युत पुरवठा सुरळीत करणारे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page