पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हा बैठकीत लोणावळा येथील महेश केदारी यांची वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
भोसरी येथील हॉटेल जंजिरा येथे ही बैठक पार पडली. सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष महादेव कनगुळे व युवराज दळवी यांनी केले होते. तर जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ घुले, पुणे शहराध्यक्ष बाबा साहेब कोरे,मावळ तालुकाध्यक्ष विजय नालावावडे,उपाध्यक्ष संतोष कालेकर, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष वैभव छाजड, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रोहित सरोदे व पुणे जिल्ह्यातील आदी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महेश केदारी यांना शुभेच्छा दिल्या.