लोणावळा(प्रतिनिधी): शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख व शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश केदारी यांची ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन च्या नॅशनल सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्ष संजय पवार यांनी हे नियुक्ती पत्र केदारी यांना सुपूर्द केले आहे.लोणावळ्यातील वलवण या गावचे रहिवासी महेश केदारी यांनी कमी वयात मोठ्या जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.