रायगड (प्रतिनिधी): राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा सालाबादप्रमाणे जयंती सोहळा पाचाड येथे संपन्न झाला.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त तारा राणी ब्रिगेड संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.2009 सालापासून हा जयंती सोहळा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे आयोजित करण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही तारा राणी ब्रिगेड संघटनेच्या वतीने याठिकाणी सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
महापुरुषांच्या विचार धारेचा जागर करण्यात आला. तसेच तारा राणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा वंदना मोरे यांनी माँसाहेब जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी तारा राणी ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा वंदना मोरे,आमदार भरत गोगावले, तारा राणी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा कविता खोपकर, रायगड जिल्हाध्यक्षा वर्षा मोरे यांसह सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी तसेच माँसाहेब जिजाऊ प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यशासनाने जिच्या धाडसाचे कौतुक करून महिलांसाठी पुरस्कार जाहीर केला. त्या हिरकणींचे याठिकाणी स्मारक व्हावे, तसेच हा दिवस हिरकणींचा मातृदिन व शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी यावेळी तारा राणी ब्रिगेड संघटना, शिवप्रेमी व माँसाहेब जिजाऊ प्रेमीं कडून करण्यात आली.