Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाजगाव ग्रामपंचायतिची उपसरपंच पदाची निवडणूक रद्द..

माजगाव ग्रामपंचायतिची उपसरपंच पदाची निवडणूक रद्द..


जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपसरपंच पदाची निवडणूक रद्द, उपसरपंचपदी मीनल जाधव विराजमान..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

माजगांव ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मिनल जाधव यांनी राजीनामा दिला नसतानाही त्यांचा खोटा राजीनामा मासीक सभेत मंजूर करून उपसरपंच पदासाठी निवडून लावल्याच्या विरोधात मिनल जाधव यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या तक्रार केली होती.
जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची तपासणी करून उपसरपंचपदाची निवडणूक रद्द केल्याचे आदेश देत पुन्हा उपसरपंचपदी मिनल जाधव पदासाठी हिरवा कंदील दिल्यावर समर्थकांनी मोठा जल्लोष करीत तर उपस्थित समर्थकांनी जल्लोष करीत अखेर सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे.

खालापूर तालुक्यातील माजगांव ग्रुप ग्रामपंचायतीवर विकास आघाडी माध्यामातून थेट सरपंचपदी गोपिनाथ जाधव यांच्यासह सहा सदस्य निवडून आले.सर्व सदस्यांना विकासकामे करण्यासाठी संधी मिळावी या उद्देशाने एक वर्षासाठी उपसरपंचपद देण्याची प्रथा सुरू केली.
रजनी कांबळे यांचा एक वर्षाचा उपसरपंचपदाचा कालावधी संपल्यावर शेकाक्षाच्या मिनल जाधव यांनी पदभार स्विकारला असता संरपच यांंनी ग्रामपंचायतीच्या कारभारात विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सौ.जाधव यांनी करीत उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.
विरोधकांनी दि.२३ जून २०२० रोजी खोट्या सहीची राजीनामा सादर करीत दि.२५ जून २०२० च्या मासिक सभेत कोणतीही सुचना देता सत्यता पडताळणी केली व या सभेला मिनल जाधव यांनी बहिष्कार टाकला होता.त्यानंतर दि.२५ जुलै २०२० रोजी पिठासीन अधिकारी म्हणून सरपंच यांनी उपसरपंच पदाचासाठी निवडून जाहिर केली असल्याचा अजेंठा दि.२१ जुलै २०२० रोजी मिनल जाधव यांना प्राप्त होताच त्यांनी त्यादिवशीच तातडीने जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करीत मी राजीनामा दिला नसून राजीनाम्यावर माझी खोटी सही असल्याची तक्रार केली.
जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी अहवाल मागवून दोन्हीही बाजूची तपासणी केली असता उपसरपंचपदाची निवडणूकी रद्द केल्याचे आदेशाचे पत्र दि.१९ आँक्टोबर रोजी दिले आहेत.

मिनल अरूण जाधव यांंनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना अभिवादन करीत पुन्हा एकदा उपसरपंचपदाची सुत्रे हाती घेतली आहेत.यावेळी सदस्य रमेश ढवाळकर,रमेश जाधव,सदस्या सरिता लभडे,अर्चना शिंदे,सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव, देवराम कांबळे, सूर्यकांत कांबळे(एस.के.)मा. सरपंच मथुरा वाघे, उपविभागप्रमूख संजय जाधव, शाखाप्रमुख-प्रकाश जाधव, चंद्रकांत कृष्णा जाधव, मंगेश पाटील, मंगेश लभडे, अरुण जाधव, राजेश जाधव, शिवाजी भोईर अतुल जाधव, संतोष जाधव,सुनील शेरे.निलेश जाधव.नरेश फराट.कालूराम जाधव.मंगेश जाधव.संतोष जाधव. वर्षा जाधव. वासंती जाधव.मनीषा जाधव. सारिका जाधव,शीतल जाधव.रसिका जाधव आदि उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव म्हणाले की,थेट सरपंचपदी निवडून आलेले सरपंच मनमानी कारभार करीत असून खोटारडा कारभार आसल्यामुळे याखोट्या प्रकारात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करणार आहोत आसे सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page