Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडमाजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये अनेक सामाजिक उपक्रम !

माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये अनेक सामाजिक उपक्रम !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेशभाऊ नारायण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कर्जतमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करत असतात . राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा माहितीचां अधिकारचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी विविध उपक्रम करून वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊंच्या प्रती प्रकट केल्या . यावेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप, बाल सुधार निरिक्षण गृह कर्जत येथे धान्याचे किट देण्यात आले , तर भिसेगाव येथील आदिवासी वाडीतील महिलांना साड्या वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा राजिपचे माजी अध्यक्ष सुरेश दादा टोकरे म्हणाले की , मी भाऊंच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे . किती आले , किती गेले , कोणाच्या गेल्याने पक्षाला फरक पडत नाही. जसा पालापाचोळा पडल्याने झाड मरत नाही , तर नवीन पालवी फुटून पुन्हा झाड बहरून येतो , तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाऊ बहरून टाकतील , असा विश्वास त्यांनी आजच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मत व्यक्त करत माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप, बाल सुधार निरिक्षण गृह कर्जत येथे धान्याचे किट देण्यात आले तर भिसेगाव येथील आदिवासी वाडीतील महिलांना साड्या वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा टोकरे, ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण , नगरसेवक तथा मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड, नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , नगरसेविका पुष्पा दगडे , नगरसेविका सुवर्णा नीलधे , पत्रकार ज्योती जाधव – कुळकर्णी , प्रकाश दादा हजारे , रमेश बुवा देशमुख, राकेश देशमुख , विमल दिसले , सुमन ठोंबरे , सुंदरा वाघमारे , वैभव पवार , जगदीश कडू , पंकज खंडागळे , निखिल हजारे , भाऊ मोरे , आदी भिसेगावं ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .या कार्यक्रमास अनेक मान्यवर भिसेगाव ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page