if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व कार्यसम्राट माजी आमदार सर्वांचे प्रेरणास्थान , लोकनेते आदरणीय श्री सुरेशभाऊ नारायण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि . ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत – खालापूरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळा संकल्प भवन – दहीवली येथे आयोजित केला होता , मात्र तो अभिष्टचिंतन सोहळा माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी रद्द केला आहे.
कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मा . सुरेशभाऊ लाड यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोश्यात सामाजिक उपक्रम करून त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते साजरा करत असतात . ९ ऑक्टोबर हा भाऊंचा जन्मदिन असल्याने त्यांच्या उज्वल भवितव्या करिता व सुदृढ आरोग्यदायी जीवनाकरिता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जत येथे त्यांच्या निवासस्थानी व संकल्प भवन येथे कार्यक्रम आयोजित करून येत असतात .मात्र यावर्षी माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी विनम्र आवाहन करून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते यांना आवाहन करताना म्हटले आहे की , ९ ऑक्टोंबर २०२३ हा माझा जन्मदिवस माझे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक व सन्माननीय नागरिक बंधू भगिनी व तमाम कर्जतकर मला शुभेच्छा देऊन साजरा करीत असतात. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यानेच आतापर्यंतचा राजकीय व सामाजिक प्रवास मी यशस्वी करू शकलो , याची मला जाणीव आहे.
परंतु यावर्षी आपल्या हाकेच्या अंतरावर असलेल्या इर्शालवाडीत भयंकर नैसर्गिक कोप होऊन मृत्यूचे तांडव झाले, तसेच नुकताच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी अनेक बालके, महिला व नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आपण सर्वजण व्यथित झालो आहोत , तसेच आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील व त्यांच्या आशीर्वादाने ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला आमदारकीची तीन वेळा संधी मिळाली , तो पक्ष ही दुभंगलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे , मला योग्य वाटत नाही. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी राहतील , याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो , असे आवाहन करून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी ठरविले आहे.