वाकसई (प्रतिनिधी) : वाकसई गावचे माजी उपसरपंच मनोज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच सोनाली जगताप यांनी वाकसई पंचक्रोशीतील महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळ रंगला पैठणीचा व “वाकसई ग्रामपंचायत सौभाग्यवती 2023” या स्पर्धेत अवनी अजिंक्य देशमुख या पैठणीच्या व प्रथम क्रमांकाच्या दुचाकी गाडीच्या मानकरी ठरल्या तर सोनाली बाबु कोकाटे या भाग्यवान महिला ठरल्या.त्यांना देखील दुचाकी गाडी भेट देण्यात आली.
सिनेअभिनेते व महाराष्ट्राचे लाडके छोटे भावजी क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.अतिशय सुंदर पद्धतीने व भव्य दिव्य असे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात जीवनातून समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले. त्यानुसार किर्तन व प्रवचनकार हभप तुषार महाराज दळवी, मृदंगाचार्य संतोष महाराज घनवट, मावळ तालुक्याचे विणेकरी हभप धोंडिबा महाराज केदारी, सैन्य दलात सेवा बजावत सेवा निवृत्त झालेले वाकसई गावचे सुपुत्र सुभेदार कैलास येवले यांना समाजभूषण तर पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे वाकसई गावाचे दुसरे सुपुत्र विशाल यशवंत विकारी यांना उत्कृष्ट वार्ताहर व समाजभूषण पुरस्कार देऊन मावळ तालुक्याचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच डोंगर कुशीतील छोटेशे खेडेगाव ते स्मार्ट व्हिलेज या वाकसई गावच्या प्रवासाचे शिलेदार असलेले वाकसई गावचे आजपर्यंतचे सरपंच किसन आहेर,सुरेश शेलार, महादू देशमुख, अनंता वीर, अंकूश देशमुख, मारुती येवले, गंगाराम विकारी, मिना येवले, दीपक काशिकर यांना आदर्श सरपंच भुषण व गावातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्य करणारे वाकसई गावच्या पोलीस पाटील दीपाली विकारी, देवघर गावचे पोलीस पाटील हभप अनंता शिंदे, करंडोली गावच्या पोलीस पाटील मीरा केदारी यांचा आदर्श पोलीस पाटील सन्मानाने गौरव करण्यात आला.
क्रांतीनाना मळेगावकर यांनी सादर केलेला खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम तब्बल चार तास रंगला. महिलांनी खेळाचा मनमुराद आनंद घेतला. या स्पर्धेच्या अंतिम खेळात खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण करत खालील महिलांनी बक्षिसे मिळवली. यामध्ये अवनी अजिक्य देशमुख यांनी प्रथम क्रमांकाची दुचाकी गाडी व मानाची पैठणी मिळविली. दुसऱ्या क्रमांकाचे डबल डोर फ्रिज व मानाची पैठणी हे बक्षिस सोनाली सोमनाथ देशमुख यांनी मिळविले. तिसऱ्या क्रमांकाचे एलईडी टिव्ही व मानाची पैठणी हे बक्षिस कोमल बाबाजी ढाकोळ यांना मिळाले. चवथ्या क्रमांकाचे वाशिंग मशिन व मानाची पैठणी हे बक्षिस स्वाती संताजी शेलार यांना मिळाले. पाचव्या क्रमांकाचे कुलर व मानाची पैठणी हे बक्षिस सोनाबाई कुंडलिक देशमुख यांना मिळाले.
वाकसई ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या लकी ड्रा मध्ये सोनाली बाबु कोकाटे (दुचाकी गाडी व पैठणी), सोनाली किरण विटेकर (मोबाईल व पैठणी), प्रिती कमलेश दुबे (वॉटर फिल्टर व पैठणी), मंगल शामराव आहेर (ओव्हन व पैठणी), कुंदा निलेश ओझरकर (चांदीचे पैंजन व पैठणी), जनाबाई काशिनाथ धोत्रे (मिक्सर व पैठणी), उज्जवला ज्ञानदेव इंगूळकर (चांदीचा छल्ला व पैठणी), प्रतिक्षा परमेश्वर पुंड (टेबल फॅन व पैठणी), जनाबाई परशूराम राठोड (इस्त्री व पैठणी), शिलाताई शिवाजी विटेकर (चांदीची जोडवे व पैठणी)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनोबा महाराज मित्र मंडळाचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल केदारी यांनी केले सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुभाष भानुसघरे यांनी केले. बाळासाहेब येवले यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते दीपक हुलावळे, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, पीएमआरडीए सदस्या दीपाली हुलावळे, माजी सरपंच सोनाली जगताप, माजी उपसरपंच मनोज जगताप, जगदगुरू संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थानचे अध्यक्ष भरत येवले, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशिकर, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा दीपाली गराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.