if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कार्ला : दहिवली मावळ येथे शासकीय योजनांचा घरेलू कामगार व बांधकाम कामगार मेळावा राज्याचे माजी मंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.या अंतर्गत मावळ तालुक्यातील 125 घरेलू कामगारांना वस्तू संच वाटप करण्यात आले व अनेक प्रकारच्या योजना चे फॉर्म भरून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, निवडणूक प्रमुख भाजपा रवींद्र आप्पा भेगडे,संत साहित्याचे गाडे अभ्यासक ह भ प संतोष महाराज काळोखे, देहू ह भ प दिलीप महाराज खेंगरे, वेहेरगाव दहिवलीच्या सरपंच पूजा अशोक पडवळ,महिला आघाडी अध्यक्षा सायली ताई बोत्रे, लोणावळा येथील नगरसेविका गौरीताई मावकर, नगरसेविका ब्रिंदाताई गणात्रा, राष्ट्रवादी नेते कैलास भाऊ गायकवाड, बाबाजी कुटे, हेमंत भाणुसघरे, युवा नेते अशोक पडवळ, भाजपा उपाध्यक्ष मधुकर पडवळ, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब किसन मावकर, वसंतराव गायकवाड, शंकरराव पडवळ, कुसगावचे सरपंच ज्ञानेश्वर गुंड, दीपक मावकर,जितेंद्र मावकर, भाजपा पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण भाऊ राक्षे,मावळ तालुका कामगार आघाडी संयोजक किसनराव येवले,मावळ तालुका कामगार आघाडी अध्यक्ष दत्ताभाऊ केले, प्रशांत ढाकोळ, व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दत्तगुरु साऊंड सर्विस चे प्रोप्रा योगेश गायकवाड यांनी मंडप व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केली.कार्यक्रमाचे आयोजन वाकसाई भारतीय जनता पार्टी गणचे अध्यक्ष अमोल भाऊ भेगडे यांनी केले.