Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत एक हजार झाडे लावण्याचा...

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत एक हजार झाडे लावण्याचा निर्धार – नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी..

आमराई येथे वृक्षारोपण करून शुभारंभ..

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आमराई येथे असलेल्या खुले नाट्यगृहात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या शुभहस्ते व मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालिकेतील नगरसेवक – नगरसेविका यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.

आपले शहर ,आपला प्रभाग ,परिसरात वृक्षारोपण केल्यास भविष्यात झाडांमुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही , व परिसर हरित दिसेल , हा स्तुत्य विचार ” माझी वसुंधरा ” या अभियान अंतर्गत प्रत्यक्षात उतरवून कर्जत नगर परिषद हद्दीत एक हजार झाडे लावण्याचा व झाडे जगविण्याचा निर्धार असल्याचे नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी मत व्यक्त केले.

यावेळी नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी ,मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील ,पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर , महिला व बाल कल्याण सभापती संचिता पाटील ,उपसभापती प्राची डेरवणकर , बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे , नगरसेविका विशाखा जिनगिरे ,नगरसेवक विवेक दांडेकर , बळवंत घुमरे , माजी नगरसेविका बिनीता घुमरे , पालिकेचे कार्यालयीन लेखापाल अरविंद नातू , आरोग्य अधिकारी सुदाम अण्णा म्हसे , कर्मचारी सुनील लाड , रवींद्र लाड , स्वच्छता मुकादम प्रदीप मोरे , प्रशांत उगले , प्रशांत परदेशी , सुरेखा प्रधान , सामिया चौगुले , आदी पालिकेचे अधिकारी – कर्मचारी व कर्जतकर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page