उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांची उमेदवारी निश्चित ,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट व घेतले आशीर्वाद…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजचा दिवस कर्जत खालापूर मधील शिवसैनिकांना एक ” आनंदाचा आणि उत्साहाचा ” दिवस ठरला . शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांची ” मातोश्री ” येथे आढावा बैठक आयोजित केली होती . कर्जत मतदार संघाचे विधानसभेच्या निवडणुकीचे प्रमुख दावेदार असलेले उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी भेट घेतली असता ” तुम्ही कामाला लागा ” असा आशीर्वाद आज पक्षाचे प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते . त्यामुळे आजची हि भेट ” विस्मरणीय ” ठरली आहे.
कर्जत – खालापूर मतदार संघाची जागा महा आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाट्याची आहे . या मतदार संघावर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता . म्हणूनच येथील उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेले व येथील शिवसैनिकांना शिव बंधनात गुंफून ” एकजुटीने ” रहाण्यास ताकद देणारे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत हे इच्छुक असल्याने येथील सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम उभे असून उमेदवारी त्यांनाच मिळावी , असे मातोश्री येथे यापूर्वीच सांगण्यात आले होते.
आता काहीच दिवसांत आचार संहिता लागू होणार असल्याने आज मातोश्री येथे भेट घेण्यासाठी रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , कर्जत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे , खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे , कर्जत शहर प्रमुख निलेश घरत , ऍड. संपद हाडप , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी या भेटीत उपस्थित होते . प्रमुख विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत ” तुम्ही कामाला लागा ” असा आदेश व आशीर्वाद उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असून पितृपक्ष संपल्यावर उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांची उमेदवारी जाहीर होणार , असेच संकेत असल्याचे समजते . त्यामुळे शिवसैनिकांच्या उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.