भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणुकीत उमेदवारी घोषित करण्यासंबंधी बैठक मातोश्री येथे घेण्यात आली असून त्यामध्ये कर्जत मतदार संघासाठी उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांची उमेदवारी फिक्स झाली असल्याचे वृत्त खास वृर्तांकडून समजली असून कर्जत मतदार संघात यामुळे शिवसैनिकांच्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेना ठाकरे गटात कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत सर्वांचेच लक्ष लागून असताना आज झालेल्या मातोश्री येथील बैठकीत उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच सामना या वृत्त पत्रात त्यांची घोषणा होणार असल्याचे समजते . हि बातमी कर्जत मतदार संघात पोहचली असून यामुळे सर्व शिवसेना – युवासेना – महिला आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.