Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरानकरांच्या सुरक्षिततेसाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यांची कैफियत केली दूर !

माथेरानकरांच्या सुरक्षिततेसाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यांची कैफियत केली दूर !

एमएमआरडीएच्या अधिकारी वर्गाच्या बैठकीत घेतला महत्वपूर्ण निर्णय…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) माथेरानकरांच्या सुरक्षिततेसाठी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गरम्य पॉईंट फिरून मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी माथेरान मध्ये धूळ विरहित रस्त्यांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या आदेशानुसार एमएमआरडीए च्या माध्यमातून विविध ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने रस्ते बनविण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे अमन लॉज स्टेशन जवळील काळोखी भागातील जवळपास २०० मीटरच्या रस्त्यावर अती उतार असल्याने घोडे घसरून पडतात त्यामुळे पर्यटकांना देखील याचा त्रास होत असल्याची कैफियत घोडेवाल्या वाहकांनी काही दिवसांपूर्वी कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे केली असता त्यांनी ताबडतोब या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन एमएमआरडीए च्या अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करून याबाबत चर्चा करून महत्वपूर्ण निर्णय घेतले.

माथेरानच्या अमन लॉज या परिसरात या उताराच्या दीड मीटर पर्यंत जांभा दगड वापरण्यात यावा आणि उर्वरित अडीच मीटर रस्ता रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाडी आणि आगामी काळात येणाऱ्या ई रिक्षासाठी वापर करण्यात यावा , याकामी आज दि.२ ऑक्टोबर २०२२ रोजी एमएमआरडीएचे अति.आयुक्त गोविंदराज साहेब , एमएमआरडीए SE निमजे साहेब, एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे , संबंधीत अधिकारी, माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रशासक सुरेखा भणगे आणि स्वतः आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यात एक विशेष बैठक आयोजित करण्यात येऊन माथेरानकरांनी मांडलेल्या कैफियत बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येऊन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यांची सुरक्षितता जपली.त्यांच्या या धडाकेबाज निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page