खोपोली- दत्तात्रय शेडगे
देशात कोरोना व्हायरसने मोठे थैमान घातल्याने सगळी कडे कडक लॉक डाऊन सरकारने जाहीर केले होते, यामुले सर्वच काम धंद्यासह माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद होता ,गेल्या पाच महिन्यापासून माथेरान चा पर्यटक व्यवसाय बंद असल्यामुळे येथील घोडेवाले ,हॉटेल, बंद होते त्यामुळे येथील घोडेवाल्यासह गोर गरीब जनतेचे हाल झाले होते.
सरकारने लॉक डाऊन चार चे नियम शिथिल केल्याने आज पासून माथेरान पर्यटकांसाठी चालू केले असून यामुळे घोडे वाल्याचा व्यवसाय चालू झाल्यानें त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गोर गरीब व ज्यांचे हातावरचे पोट असलेल्या गरीब घोडे मालक यांचे अतोनात हाल होऊन उपास मारीची वेळ आली होती, मात्र आज पासून पर्यटकांसाठी माथेरान खुले केले असून आज पहिल्यादा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम आखाडे यांच्या घोड्यावर पहिला पर्यटक गेल्यानं सर्व घोडे मालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.