माथेरान मध्ये विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमीपूजनाचा सोहळा संपन्न…
दत्ता शिंदे…..माथेरान
आज सोनियाचा दिवस अमृते पहिला असा हा दिवस माथेरान ची झपाट्याने होणारी विकास कामे नक्कीच माथेरानला जागतिक पर्यटन स्थळा कडे नेणारी अभिमाना स्थव बाब असून आज विविध ठिकाणी माथेरान नगरपरिषदेच्या वतीने विकास कामांचे उद्घाटन सोहळा तसेच भूमी पूजन झाले.त्याच प्रमाणे नगरपरिषदेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
आजचा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यासाठी कार्यसम्राट कर्जत खालापूर चे माननीय आमदार महेंद्र थोरवे व माथेरान च्या लाडक्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या शुभ हस्ते भूमी पूजनाचा व उद्घाटन सोहळा करण्यात आले.
माथेरान पंचवटी नगर येथे गार्डन चे काम स्वच्छ सर्वक्षण अंतर्गत विकसीत होणार असून भूमी पूजन सोहळा संपन्न झाला. प्रमाणे वीर हुतात्माभाई कोतवाल प्राथमिक शाळेच्या संरक्षक कंपाउंड वॉल चे बांधण्यात आली त्याचे उद्घाटन करण्यात आले.त्याच प्रमाणे महात्मा गांधी रोड ( मुख्य रस्ता) लागून खंडाळा पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमी पूजन करण्यात आले असून माथेरान नगरपरिषद कार्यालय परिसर वॉल उद्घाटन व कार्यालय समोर सुशोभित कमानीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.त्याच प्रमाणे सौराबजी पांडे रोड व श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड येथील सुशोभित कमानीचे उद्घाटन पुढे पबानी पाथ रोड कॉन्व्हेंट स्कुल जांभा दगडाच्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
हे सर्व भूमी पूजनाचा सोहळा तसेच उद्घाटन सोहळा कर्जत खालापूर चे कार्यसम्राट मा.आमदार महेंद्र थोरवे व माथेरान च्या लाडक्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.या वेळी माथेरान चे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव माथेरान चे कार्यकुशल उपनगराध्यक्ष आकाश चौधरी ,तसेच माथेरान ची विकासाची तळमळ असणारे गटनेते बांधकाम सभापती प्रसाद सावंत,माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी ,नगरसेवक नरेश काळे,राजेंद्र शिंदे,राकेश चौधरी, चंद्रकांत जाधव ,माजी नगरसेवक प्रदीप घावरे,कुलदीप जाधव,नगरसेविका सोनम दाभेकर,सुषमा जाधव,कीर्ती मोरे, प्रतिभा घावरे,ऋतुजा प्रधान,ज्योती सोनावळे,संगीत जांभळे, सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे,वासंती ताई जांभळे, तसेच माथेरान पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रशांत काळे, नगरपालिका कर्मचारी वृंद शिक्षक वर्ग व सन्मानीय स्थानिक वर्ग उपस्थित होते..