माथेरान (दत्ता शिंदे) सारख्या छोट्याशा पर्यटनस्थळावर दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने यापुढे दि.१९/२० एप्रिल रोजी लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल मधील कर्मचारी वगळता दुकानदार आणि त्यांचे कामगार यांची कोव्हीड तपासणी करण्यात येणार आहे.
त्यासाठी नगरपरिषदेकडून खासकरून कोरोना या महामारीवर निर्बंध आणण्यासाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील शास्त्री हॉल ( कम्युनिटी सेंटर ) येथे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात येणार असून त्यानंतर दोन दिवसांनी लॉजिंग, बोर्डिंग हॉटेल मधील कर्मचारी यांचीही कोव्हीड तपासणी करण्यात येणार आहे.
त्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे.हे प्रमाणपत्र केवळ १५ दिवसांसाठी वैध राहणार आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आढळून न आल्यास त्यांच्याकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत ध्वनिक्षेपक द्वारे नगरपरिषद कर्मचारी नियमितपणे दवंडी देत आहेत.