माथेरान (दत्ता शिंदे )महाराष्ट्राचे नंदनवन तसेच रायगडची शान थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले माथेरान पण कोरोनाच्या महामारीने येथील पर्यटन पूर्ण पणे ठप्प झाल्याने येथील लॉजिंग व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनाच्या महामारीने आठ महिने लॉकडाऊन ने येथील लोजिंग व्यवसाय पूर्ण पणे बंद होते त्यानंतर जेमतेम तीन महिने लॉकडाऊन खोलल्यावर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यावर पुन्हा लॉकडाऊनला लॉजधारकांना सामोरे जावे लागले परंतु येथील भौगोलिक परिस्थिती पाहता माथेरान हे उंच व थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे कोणत्याही प्रकारे दुसरा व्यवसाय करता येत नाही.
फक्त येणाऱ्या पर्यटकांवर येथील जनजीवन अवलंबून आहे त्या मुले येथील लॉजिंग व्यवसायवर शासनाने कोणत्याही प्रकारे सूट अथवा सूट दिलेली नसल्याने ज्या प्रकारे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने आत्महत्या करीत आहेत त्या प्रकारे माथेरान मध्ये असेच लॉकडाऊन वाढल्यास शासनाने माथेरानकडे दुर्लक्ष केल्यास लॉजधारकांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
माथेरान मध्ये पाण्याचे बिल वीज बिलाबाबत तेच येथील नगरपालिका घरपट्टी भरायचे तरी कसे त्यात काहीच पर्याय उद्योग नसल्याने सर्व काही रिकाम्या हाताला काम नाही हाच मोठा प्रश्न येथील छोट्यामोठ्या लॉजधारकला पडला आहे लॉकडाऊन तर दर पंधरा पंधरा दिवसांनी वाढत आहे पाऊस तर डोक्यावर आलेला आहे.काही करावे हेच येथील लॉजधरकांना समजण्यापलिकडे गेले आहे निदान शासनाने लाईट बिल व पाणी बिलात त्याच प्रमाणे घरपट्टीत सूट दिली तरी लॉजधारकांना दिलासा मिळेल.