Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळमान्सून पूर्व कामे तात्काळ पूर्ण करून घ्या,तहसीलदार बर्गे यांच्या सूचना..

मान्सून पूर्व कामे तात्काळ पूर्ण करून घ्या,तहसीलदार बर्गे यांच्या सूचना..

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने नदी – नाल्यांमधील गाळ , जलपरणी साफ करण्याची मावळ तहसीलदारांची सूचना – मावळ : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने नदी नाल्यांमधील गाळ , जलपरणी साफ करावी अशी सूचना वजा आदेश मावळ तहसीलदार यांच्या वतीने मावळ तालुक्यातील औंढे , पाटण , कार्ला , वाकसई , खडकाळे व ताजे या गावांना करण्यात आला आहे . व तहसिल कार्यालय मावळ येथे मान्सून पुर्व तयारीच्या अनुषंगाने मावळ तालूक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख यांची आढावा बैठक रोजी आली . त्यामध्ये सर्व संबंधित विभाग प्रमुख यांना मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कामे तात्काळ पुर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत .

एकविरा कृती समितीच्या वतीने तहसीलदार कार्यालयास पत्र देऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील नदी , नाले , ओढे यामध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असून जलपर्णी व बेशरमची झाडे वाढलेली आहेत.त्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठया प्रमाणात पाणी गावामध्ये शिरते . त्यामुळे सदर ओढा व नाल्यांमधील गाळ काढण्यास तसेच जलपर्णी व बेशरमची झाडे काढण्यास परवानगी मिळण्यासाठी विनंती केली होती.

त्यानुसार तहसिल कार्यालय मावळ येथे मान्सून पुर्व तयारीच्या अनुषंगाने मावळ तालूक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेण्यात आली . त्यामध्ये सर्व संबंधित विभाग प्रमुख यांना मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक तात्काळ पुर्ण करणेबाबत सुचना दिल्या . त्यानुसार गावातील नदी , नाले , ओढे यामधील गाळ तसेच जलपणी व इतर अडथळे तात्काळ काढून टाकण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्या मार्फत तहसील कार्यालयास सादर करावा , असे तहसील कार्यालयाने मावळ गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page