![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ भूमीचे शिव व्याख्याते, प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना राज्यस्तरीय शिव व्याख्याते पुरस्कार जाहीर..
मावळ : प्रतिनिधी संदीप मोरे.
मावळ: लातूर / शिरूर, ता. ५ जुलै – श्री. गोविंद श्रीमंगल यांच्या जन्म सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलन, शिरूर (जि. लातूर) यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ६ जुलै रोजी लातूर येथे पार पडणार आहे.
या विशेष सोहळ्यात मावळच्या मातीतून घडलेल्या प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम श्री. संत सेना महाराज मंदिर, लातूर येथे आयोजित करण्यात आला असून, कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद कवयित्री पूजा माळी भूषवणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी गोविंद संभाजी श्रीमंगल असणार आहेत, जे श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत.
शिवचरित्र, आंबेडकरी विचार आणि सामाजिक जागृतीची परंपरा यांचा वारसा घेऊन सागर वाघमारे यांनी समाज प्रबोधनाच्या कार्याला स्वतःहून दिशा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, जिजाऊ यांचे कार्य प्रभावीपणे व्याख्यानातून मांडत त्यांनी तरुणांमध्ये विचारांची ठिणगी पेटवली आहे.
स्वतःच्या नियोजनातून लेखक वर्गासाठी व्यासपीठ निर्माण करून, विविध स्पर्धा, उपक्रम आणि व्याख्याने याच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय पातळीवर त्यांचा सन्मान होत असल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावरून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.