if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील ऍट्रॉसिटी ॲक्ट (3/1) गुन्हयातील आरोपींना अटक व्हावी आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव मावळ तहसील कार्यालया समोर शुक्रवार दि.7 रोजी खालील विषयांना चर्चेत घेवुन ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रक आर पी आय (A) च्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले आहे.सदर आंदोलनातील मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
1)मावळ तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यातील ऍट्रॉसिटी ॲक्ट (3/1) मधील गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी,2) गांव मौजे करंजगांव , ता . मावळ , जि . पुणे येथील किशोर तंबोरे खून प्रकरणीतील केस ही दीड वर्षापासुन आजतागायत आरोपी निष्पण न झाल्याने सदरील केस सी.बी.आय.कडे वर्ग करावी, 3) मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाण्यामधील मा . कोर्टाच्या आदेशाने दाखल ऍट्रॉसिटी अॅक्ट ( 3/1 ) मधील आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, 4) मावळ तालुक्यासाठी स्वतंत्र मा . उपविभागीय आयुक्तांची नेमणुक करण्यात यावी,5) पंचायत समिती मावळ येथील विस्तार अधिकारी श्री . बी.बी.दरवडे व जुन्नर येथील ग्रामीण विकास अधिकारी श्री.बाळासाहेब वनघरे यांच्यामध्ये फोनव्दारे जातिवाचक विधान झाल्याच्या विरोधात वडगांव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने ऍट्रॉसिटी ॲक्ट ( 3/1 ) नुसार गुन्हा दाखल करावा,
यावेळी आरपीआय (A) जिल्हाध्यक्ष विकासजी साळवे, मावळ तालुका युवक अध्यक्ष चंद्रकांतजी ओव्हाळ, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अकुंशजी चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष सुनिलजी सोनवणे, कामशेत शहराध्यक्ष दिनेशभाऊ शिंदे,तालुका युवक कोषाध्यक्ष किशोर वंजारी, तालुका युवक कार्याध्यक्ष दिलीप सुतार, सामाजिक कार्यकर्ते पप्पू तंबोरे, लोणावळा शहर युवा अध्यक्ष निलेश देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.