Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळमावळात जनावरांचे लंपी लसीकरण मोहीम जोरात, पिंपळोली येथील 150 जनावरांचे लसीकरण पूर्ण...

मावळात जनावरांचे लंपी लसीकरण मोहीम जोरात, पिंपळोली येथील 150 जनावरांचे लसीकरण पूर्ण…

कार्ला(प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील पिंपळोली येथे 150 जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

तालुक्यातील काही जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे . त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बळीराजाच्या पशुधनाला येथील ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ चौरे यांच्या विशेष प्रयत्नातून लम्पी प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लम्पी ( चर्मरोग ) आजारामुळे बळीराजा भयभीत झाला आहे . दिवसेंदिवस लम्पी संसर्गाचे प्रमाण वाढतच चालले आहे . शेतकऱ्यांचा मित्र , पालनहार त्यांची जनावरे आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह हा शेतीतून होतो . त्यात त्याला मदत करणाऱ्या सर्जा राज्यावर हे एक संकट आले आहे . अतिवृष्टीमुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत लम्पी आजाराने भर पाडली . काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. आपल्याला निस्वार्थपणे साथ देणाऱ्या आपल्या पशुधनाला काही होऊ नये म्हणुन शेतकरी चिंतातुर झाला आहे.

अशा परिस्थितीत घाबरुन न जाता संकटाला सामोरे जाण्याची तयारी शेतकरी वर्गात आहे . त्यावर उपाय म्हणजेच लम्पी लसीकरण हे एक शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे.याचेच महत्व ओळखून पिंपळोली गावातील प्रयत्नशील ग्रा . पं . सदस्य आणि नाणे मावळ आरपीआयचे अध्यक्ष सिध्दार्थ चौरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पिंपळोली गावामध्ये लम्पीची लसीकरण मोहीम पार पडली व त्याला शेतकरी वर्गाने देखील प्रतिसाद देत आपल्या जनावरांना लस टोचवून घेतली.

यावेळी सरपंच निलम सुतार , मा . उसरपंच संदिप चौरे , प्रसिद्ध दुध व्यावसायिक भरत गायकवाड , अंकुश चौरे , शि . स . मा . अध्यक्ष सुभाष गायकवाड , आरपीआय अध्यक्ष सुनील चौरे , तंटामुक्त अध्यक्ष संतोष बोंबले , काळु चौरे , प्रदिप चौरे , हनुमंत तावरे , बाळासाहेब गायकवाड , योगेश चौरे , उपस्थित होते.

तसेच यावेळी डॉ . पाटिल यांनी जनावरांची घ्यावयाची काळजी या संदर्भात माहिती दिली व प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरण केले . त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान सरपंच निलम सुतार अंकुश चौरे , भरत गायकवाड , सुभाष गायकवाड यांनी केला व आभार तंटामुक्त अध्यक्ष शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष बोंबले यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page