if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तळेगाव (प्रतिनिधी): पुणे भारत स्काऊट गाईड व शिक्षण विभाग पुणे आयोजित तालुका स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीरांची मालिका जिल्ह्यात सुरु असून शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा. श्री. सुदाम वाळुंज यांचे मार्गदर्शनाखाली जि. प. प्राथमिक शाळा कान्हे येथे मावळ तालुक्यातील स्काऊट गाईड संघनायकांचा एकदिवशीय प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात तालुक्यातील विविध शाळांमधून 64 स्काऊट, 62 गाईड तसेच 22 शिक्षक सहभागी झाले होते.
स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास, प्रवेश अभ्यासक्रम, संघपद्धती महत्व व अंमलबजावणी, संघनायक जबाबदारी व कर्तव्ये, विविध उपक्रम, राज्य/राष्ट्रपती पुरस्कार इ. घटकांचे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन कान्हे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अजित नवले यांचे शुभहस्ते करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करीत त्यांनी शिबीरार्थींना शुभेच्छा दिल्या.
मेळावा प्रमुख ना. बा. मानकर, प्रशिक्षण समुदेशक विजय जोरी, केंद्रप्रमुख पांडुरंग ढेंगळे, प्रशिक्षण समुदेशक सुजाता तारळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्काऊटर विशाल मोरे व प्रविण ढवळे, गाईडर तरुणा सुपे, वंदना इंगुळकर व सुधा हांडे यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी रेंघे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पंचायत समिती शिक्षण विभाग विषय तज्ञ बिल्किसबानो अन्सारी यांनी शिबाराचे आयोजन नियोजन केले, पुणे भारत स्काऊट गाईड च्या संघटक उषा हिवराळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करुन पथक नोंदणीबाबत निवेदन केले, विनोद उमाप यांनी नोंदणी कार्य पार पाडले तर हरी चाळक यांनी उपस्थितांचे आभार मानले.