Sunday, September 8, 2024
Homeपुणेलोणावळामावळ तालुक्यात पर्यटकांवर बंधने लागू: सुरक्षेसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल..

मावळ तालुक्यात पर्यटकांवर बंधने लागू: सुरक्षेसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल..

आज दि.२ लोणावळ्यात भूशी डॅमच्या जवळील सर्व दुकाने आणि हॉटेल्सवर लोणावळा नगरपालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे अतिक्रमित जागेत असलेल्या दुकानांच्या आणि हॉटेल्सच्या मालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने परिसरातील अतिक्रमण हटवण्याची गरज अधोरेखित केली आहे. मात्र, या कारवाईमुळे अनेक स्थानिक व्यवसायांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मावळ : ( श्रावणी कामत ) तालुक्यातील लोणावळा येथे ३० जून २०२४ रोजी भूशी धरणाच्या वरच्या बाजूस आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ५ पर्यटकांचा पाण्यात वाहून मृत्यू झाल्याने पर्यटन स्थळांवर बंधने लागू करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सो पुणे यांनी जबाबदारीयुक्त पर्यटन (Responsive Tourism) राबविण्याच्या सूचनांनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सुरेंद्र नवले, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, पुणे उपविभाग यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक २ जुलै २०२४ पासून खालील ठिकाणांवर बंधने लागू केली आहेत.
सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील तीन छोटे धबधबे, भूशी डॅम येथील रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊसच्या वरचा भाग, भूशी डॅमच्या पश्चिमीक बाजूचा वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट इत्यादी ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सहारा पुलावर वाहनांची पार्किंग संपूर्णतः बंदी करण्यात आली आहे. सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्यांच्या वरच्या बाजूस जाण्यास पूर्णतः बंदी आहे. भूशी धरणाच्या रेल्वे गेस्ट हाऊसपासून वर जाण्यास संपूर्णतः बंदी करण्यात आली आहे. भूशी धरणाच्या पश्चिमीक (west weir) बाजूने वरच्या धबधब्याकडे जाण्यास पूर्णतः बंदी आहे. लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट येथे सायंकाळी ६.०० वाजेपासून सकाळी ६.०० वाजेपर्यंत पर्यटकांना जाण्यास पूर्णतः बंदी आहे.
या आदेशांची अंमलबजावणी पोलिस विभाग, वन विभाग, नगर पालिका, रेल्वे विभाग इत्यादीनी संयुक्तरित्या करावी. रेल्वे विभागाने गेस्ट हाऊसच्या बाजूने वर जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंगची तात्काळ व्यवस्था करावी. वन विभागाने लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट या ठिकाणी सायंकाळी ६.०० ते सकाळी ६.०० या कालावधीत कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करावेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश २ जुलै २०२४ पासून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लागू असेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page