लोणावळा दि.16 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात covid-19 लसीकरण मोहिमेस विविध केंद्रांवर प्रारंभ झालेला आहे. मावळ तालुक्यात देखील covid 19 लसीकरण केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे या ठिकाणी आज सकाळी 11.00 वाजता लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
सदर केंद्रावर सिरम इन्स्टिट्यूट निर्मित COVI-SHIELD लस प्राप्त झालेली असून या लसीचा आज पहिला डोस अनिल रडे व दुसरा डोस भाग्यश्री परदेशी या आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यानंतर लसीकरणास प्रारंभ झाला.
मावळ तालुक्यातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयातील 3700आरोग्य कर्मचारी अधिकारी यांचे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केंद्र शासनाच्या Co-Win पोर्टल ला यापूर्वीच करण्यात आलेले आहे.त्यानुसार प्रति दिवशी शंभर लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.
जे लाभार्थी नोंदणीकृत आहेत त्यांना लसीकरणाच्या एक दिवस अगोदर केंद्रस्तरावरून मोबाईल संदेशाद्वारे लसीकरणाचे ठिकाण व वेळ कळविण्यात येणार आहे व त्यानुसार सदर लाभार्थी केंद्रावर पोहचनार. याप्रमाणेच पुढील लसीकरण कार्यवाही सुरू राहणार आहे.
प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष, लसीकरणानंतर निरीक्षण कक्ष याप्रमाणे लसीकरण केंद्रावर रचना करण्यात आलेली आहे. लसीकरणानंतर तीस मिनिट लाभार्थ्याला निरिक्षण कक्षात थांबवले जाणार आहेे.
शासनाच्या सर्व नियमांचे व दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर लसीकरणाचा प्रारंभ ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा याठिकाणी करण्यात आलेला आहे.त्यानुसार आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 33 लाभार्थ्यांना यशस्वीरित्या लस देण्यात आलेली आहे.
यापैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवला नाही..
डॉ. संजय देशमुख, आरोग्य उपसंचालक पुणे मंडळ पुणे,डॉ अशोक नांदापुरकर ,जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रूग्णालय पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, मावळ तालुका कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे हे सदर केंद्रावर कामकाज पाहत आहेत.
पुढील मान्यवरांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले .तसेच लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी ,डॉक्टर ,कर्मचारी यांनी वेळापत्रकाप्रमाणे व आलेल्या आदेशानुसार लसीकरण करून घ्यावे याबाबतचे आवाहन केले..डॉ दीपक म्हैसेक नि.मा.विभागीय आयुक्त भा.प्र.से.मुख्य सल्लागार मुख्यमंत्री महाराष्ट्र पुणे कार्यालय, डॉ.अशोक नांदापुरकर मा.जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रूग्णालय, पुणे.
श्री.मधुसदन बर्गे तहसीलदार मावळ, श्री.सुधीर भागवत
गटविकास अधिकारी मावळयांसर्वांचे खूप मोलाचे योगदान ठरले आहे.