if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):मावळ बंदला आज लोणावळा शहर व्यापारी संघाने पाठिंबा देत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली तसेच ग्रामीण भागातील वरसोली, वाकसई, कार्ला, वेहेरगाव, वरसोली,मळवली,कुसगाव या सर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध सभा घेण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी जालना याठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याचा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज लोणावळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून लोणावळा शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, रिक्षा, टॅक्सी, कंपन्या, भाजी मंडई असे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा व शाळा महाविद्यालये वगळता बाकी सर्व लोणावळा बंद ठेवत सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मराठा समाज व इतर सर्व समाजाचे नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी व कार्यकर्ते एकत्र जमले होते. याठिकाणी सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाचा व पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
त्याचबरोबर नागरिक मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.