Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमावळ मधून वंचित ची " पहिली महिला खासदार " म्हणून निवडून येवून...

मावळ मधून वंचित ची ” पहिली महिला खासदार ” म्हणून निवडून येवून इतिहास घडणार,सौ. माधवी ताई जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजही मावळ मतदार संघात रस्ते – वीज – पाणी – शिक्षण – आरोग्य – महिलांचे सक्षमिकरण – तरुणांना रोजगार हे मूलभूत प्रश्न असून ते सोडविण्यासाठी आजपर्यंत येथील निवडून येणारे आमदार खासदार यांनी लक्ष दिले नसल्याने एक महिला उमेदवार म्हणून याकडे गांभीर्याने लक्ष देवून सर्व समस्यांविरोधात आवाज उठविणे गरजेचे असल्याने येणाऱ्या १३ तारखेला वंचित बहुजन आघाडीची मी उमेदवार असून माझी निशाणी ” ऑटोरिक्षा ” या निशाणी वर मत देवून मला बहुमताने निवडून द्या , असे आवाहन मतदारांना मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूकीस सामोरे जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ माधवी ताई नरेश जोशी यांनी आज दिनांक ११ मे २०२४ रोजी दुपारी ठीक ४ – ०० वाजता आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की , मला वंचित बहुजन आघाडीची जी उमेदवारी मिळाली , व ती पक्षाचे सर्वेसर्वा ” श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ” यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला , याबद्दल मी त्यांची आभारी असल्याचे मत व्यक्त करत , हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवत मावळ मतदार संघातून वंचित ची पहिली महिला खासदार म्हणून निवडून येवून नक्कीच इतिहास घडेल , असे आत्मविश्वासाने सांगितले.

आम्ही प्रचार दौऱ्यात गावात – वाड्यात – पाड्यात – झोपडपट्टी – शहरात – खेड्यापाड्यात – आदिवासी वस्त्यांत पोहचलो आहे , आजही त्यांना रस्ते – वीज – पाणी – या गरजा मिळत नाहीत . महिलांचे आरोग्य – शिक्षण या समस्या खूप मोठ्या आहेत . बाळासाहेबांनी दिलेली मला संधी आहे , एक महिला उमेदवार म्हणून मी सर्व समस्या सोडविणार , असे आश्वासन दिले.

माझ्या पुढे कोण – मागे कोण आहे , उमेदवार श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे पाटील याचा विचार मी कधी केला नाही , मी निवडणुकी पूर्वी पासूनच मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करीत आलो आहे , आजही बचत गट नुसते नावाला आहेत , परंतु जी महिला सक्षमीकरणाची उभारी घ्यायला पाहिजे , ती दिसत नाही . त्यांना लघु उद्योगांसाठी कर्जे , इतर साधन सामुग्री दिली जात नाही . म्हणूनच ” चूल आणि मूल ” या बंधनातून महिलांना बाहेर काढणार .माझ्या पाठीशी मासाहेब जिजाऊ – सावित्रीमाई फुले – माता रमाई यांचे आशीर्वाद आहेत.

खेड्यापाड्यात आदिवासी समाजाची शिक्षणाची समस्या कठीण झाली आहे . जिल्हा परिषदांच्या शाळा बंद पडत आहेत , त्या पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य देणार ,महिलांची आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य देणार असे मत त्यांनी व्यक्त केले .
खोपोली – रसायनी – पनवेल , या ठिकाणी कंपन्या बंद तर कुठे स्थलांतर झाल्या आहेत , येथील तरुणांना रोजगार नाही .याबाबतीत येथील आमदार खासदार यांनी आवाज उठवला नाही , येथील तरुणांना जर रोजगार मिळत नसेल तर काय उपयोग , पाणी जवळ असूनही कठीण प्रसंगातून नागरिकांना सामोरे जावे लागते , माथेरान रस्ता , श्री भिमा शंकर रस्ता , अजूनही दयनीय अवस्थेत आहेत यावर आवाज उठवणार . त्यांना पोलीस मित्र संघटना , ऑल इंडिया पँथर सेना , तारा राणी संघटना , स्वराज्य – संविधान पँथर सेना , ब्ल्यू टायगर संघटना , अश्या अनेक सामाजिक संघटनेचा पाठींबा मिळाला आहे , हे नमूद केले . कर्जत – खालापूर – उरण – पनवेल तसेच मावळ – पिंपरी – चिंचवड – या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची खूप मोठी ताकद आहे , तर भारतीय बौद्ध महासभा हि धार्मिक संघटना , तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचे पाठबळ वंचित च्या उमेदवार सौ. माधवी ताई नरेश जोशी यांच्या पाठीशी ठाम आहे.

आम्ही प्रचारात रॅली पेक्षा प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत मला ” ऑटो रिक्षा ” या निशाणी वर मत देवून बहुमताने निवडून देवून , या जिजाऊच्या लेकीला संसद भवनात ” खासदार ” म्हणून निवडून द्या , व वंचित ची मावळ लोकसभा मतदार संघातील पहिली महिला खासदार म्हणून इतिहास घडवा , असे आवाहन सौ . माधवी ताई नरेश जोशी यांनी मतदार बंधू भगिनींना पत्रकार परिषदेत केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page