if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : ज्येष्ठ पत्रकार कै. विजय अडसुळे यांनी स्थापन केलेल्या मावळ वार्ता फौंडेशन चा 22 वा वर्धापन दिन बुधवार दि.13 रोजी सायंकाळी 6 वाजता कुमार रिर्सार्ट येथे भव्यदिव्य आणि सामाजिक उपक्रम स्वरुपात साजरा झाला.
यावेळी मावळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी कार्य करताना स्वतःचा ठसा ‘ उमटविणाऱ्या गुणीजनांचा मावळवार्ता गौरव पुरस्कारा’ ने यावेळी सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील श्री. बबनराव भेगडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर श्री गणेश काकडे, उद्योजक, अध्यात्मिक पुरस्कार ह. भ.प. नंदकुमार शेटे यांना तर वैद्यकीय क्षेत्राचा डॉ. सिमा शिंदे, पत्रकारिता विलास भेगडे, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार अनिल तोडकर यांना देण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दलचा पुरस्कार ला.अनिल गायकवाड यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.योग-क्रीडा पुरस्कार धनंजय डेंगळे यांना तर कौंन्सीलपटू मयूर ढोरे आणि ग्रामगौरव पुरस्काराने भाजे गावचे मा. सरपंच चेतन मानकर यांना गौरविण्यात आले.
विशेष गौरव पुरस्कार चेतन वाघमारे,विशाल सांखला, आयशा हिबा यांना तर उत्कृष्ट शाळा पुरस्कार रायवूड इंटरनॅशनलला देण्यात आला.
बुधवार दि. 13 रोजी सायंकाळी कुमार रिसोर्टच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरुपात साजरा झालेल्या मावळ वार्ताच्या 22 व्या वर्धापनदिनी सिने अभिनेते माधव अभ्यंकर, विजय पटवर्धन,अप्पर आयुक्त महासचिव सह.पवन व वस्त्रोद्योग विभाग चंद्रमणी इंदुरकर,मा.अधीक्षक येरवडा जेल रघुनाथ सावंत,रिटायर्ड पॅरा कमांडो गुरुवर्य वसंतदादा खानविलकर, लोणावळा डी.वाय.एस.पी.सत्यसाई कार्तिक, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मा. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, बापुसाहेब भेगडे, सुरेश धोत्रे, तळेगाव, लोणावळा, वडगावचे आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, स्पेसलिंक केबल नेटवर्कचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य संचालक संजय अडसुळे, अध्यक्ष नासिर शेख, उपाध्यक्ष रवी सलोजा, डॉ. किरण गायकवाड, नंदकुमार वाळंज, जितेंद्र कल्याणजी, राजेंद्र चौहान, सचिन पारख, बाळासाहेब फाटक, मंगेश आगरवाल, गणेश साबळे, भरत तिखे, संदीप वर्तक आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची लोकधारा हा सोल ऑफ सह्याद्री कार्यक्रम स्थानिक कलाकारांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुलाल तारे यांनी केले तर त्यांना साथ प्रदीप वाडेकर यांनी दिली.