Sunday, September 8, 2024
Homeपुणेलोणावळामावळ वार्ता फौंडेशन च्या अध्यक्ष पदी पप्पूभाई शेख तर जागो हिंदुस्थानी कार्यक्रमाच्या...

मावळ वार्ता फौंडेशन च्या अध्यक्ष पदी पप्पूभाई शेख तर जागो हिंदुस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी रमेश पाळेकर…

लोणावळा (प्रतिनिधी):मावळ वार्ता फौंडेशन च्या 2024/25 या वर्षाच्या अध्यक्ष पदासाठी लोणावळाळ्यातील नासिरभाई (पप्पूभाई )शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. तर 26 जानेवारी 2024 च्या “जागो हिंदुस्थानी” या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रमेश भाऊ पाळेकर यांची निवड करण्यात आली.
मावळ वार्ता फौंडेशन 2024/25 साठी नव्याने निवड करण्यात आलेले कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे अध्यक्ष पदी नासिर (पप्पूभाई) शेख, उपाध्यक्ष पदी रवी सलुजा, सेक्रेटरी पदी मनीषा बंबोरी, खजिनदार पदी भरत तिखे, सह खजिनदार पदी संदीप वर्तक यांची बहुमताने निवड करण्यात आली.
तसेच मावळ वार्ता फौंडेशन कडून 26 जानेवारी रोजी आयोजित “जागो हिंदुस्थानी”या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी लोणावळा शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक रमेश भाऊ पाळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page